लंडन : ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ( Gold Medalist Neeraj Chopra ) याने 2022 साठीची आपली महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये जाहीर केली आहेत, ज्यात त्याच्या पहिल्या जागतिक विजेतेपदासाठी आव्हान असलेले राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकांचे रक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. टोकियो गेम्स भालाफेकीत सुवर्णपदक विजेत्या चोप्राने प्रतिष्ठित 2022 लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्ससाठी ( Laureus World Sports Awards 2022) वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर श्रेणीमध्ये नामांकन मिळवले.
चोप्राने लॉरियसच्या अधिकृत वेबसाइटला सांगितले की, सुवर्णपदकाने मला आयुष्यात आणखी चांगले करण्याची प्रेरणा दिली आहे. जुलैमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करून पोडियम गाठण्याचे माझे ध्येय असेल. याशिवाय या वर्षी राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि डायमंड लीग फायनल्स यासारख्या इतर मोठ्या स्पर्धा आहेत. या सर्व खरोखर प्रमुख स्पर्धा आहेत.
24 वर्षीय अॅथलीट म्हणाला, "प्रशिक्षण घेत असताना मला या सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये पदके जिंकायची आहेत, असे नेहमी मनात येते. मी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा ( Commonwealth and Asian Games ) स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत आणि तिथेही माझ्या कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छितो. लंडन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत मी भारताचे प्रतिनिधित्व केले. मी तिथे अंतिम फेरीत पोहोचू शकलो नाही, पण यंदा पोडियमवरच स्पर्धा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.
चोप्राने 2022 मध्ये नवीन वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करण्याकडे लक्ष दिले आहे. या क्षणी तो 88.03 मीटर आहे. तो म्हणाला, जेव्हा विशिष्ट अंतर गाठायचे असते तेव्हा आम्ही 90 मीटरचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करतो. आता खूप वेळ झाला आहे. मला वाटते की नजीकच्या भविष्यात मी ती कामगिरी लवकरच करू शकेन.
तो पुढे म्हणाला, मी नेहमी हा विचार करतो की, मी आतापर्यंत जे काय मिळवले आहे, ते सर्वश्रेष्ठ नाही. मला वाटते खरं तर मी भविष्यात याच्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करु शकतो. मला हे चांगले वाटते की, संपूर्ण देशाचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्याकडून अजून चांगली कामगिरी व्हावी अशी अपेक्षा करतो.
चोप्राने वयाच्या 23व्या वर्षी टोकियो येथे ऑलिम्पिक पदार्पण ( Olympic debut in Tokyo ) केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. 2011 मध्ये, त्याने फिटनेस सुधारण्यासाठी त्याच्या कुटुंबाच्या दबावाखाली जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. तेथे असताना त्याने खेळाडूंचा सराव पाहिला आणि भालाफेकीत त्याचा रस निर्माण झाला आणि त्याने खेळात भाग घ्यायला सुरुवात केली.
लॉरियस डॉट कॉमला ( Laureus.com ) दिलेल्या मुलाखतीत चोप्रा म्हणाला, अशा पुरस्कारासाठी नामांकन मिळणे अविश्वसनीय वाटते. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्यापूर्वीही, मी नेहमीच जगभरातील क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्कारांचा भाग होताना पाहिले आहे. मला नेहमीच त्यांच्यापैकी एक व्हायचे होते. आता, जेव्हा माझे नाव यादीत आहे, तेव्हा मला खरोखर विशेष वाटते.
जर मी जिंकलो तर मला हा पुरस्कार माझ्या यादीत सर्वात वर ठेवायचा आहे. कारण तो आंतरराष्ट्रीय पुरस्कार ( International awards ) आहे. हे खूप खास आहे आणि मला आशा आहे की भविष्यात अनेक भारतीय नामांकित होतील आणि ते भारतासाठी जिंकतील, जसे की महान सचिन तेंडुलकरने जिंकला आहे.