ETV Bharat / sports

नीरज चोप्राची 'खेलरत्न'साठी सलग तिसऱ्या वर्षी शिफारस

भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

neeraj chopra recommended for khel ratna by afi
नीरज चोप्राची 'खेलरत्न'साठी सलग तिसऱ्या वर्षी शिफारस
author img

By

Published : May 31, 2020, 7:52 AM IST

नवी दिल्ली - भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारतीय अ‌ॅथलेटिक्‍स महासंघाच्या समितीने हा निर्णय घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे, नीरज याचे नाव सलग दिसऱ्या वर्षी खेलरत्नसाठी पाठवण्यात आले आहे.

२२ वर्षीय नीरज ट्रॅक आणि फिल्डचा एकमात्र खेळाडू आहे. ज्याचे नाव भारतीय अ‌ॅथलेटिक्‍स महासंघाकडून सुचवण्यात आले आहे.

नीरज चोप्रा याने राष्ट्रमंडल आणि अशियाई स्पर्धेत सुवर्णपदाकाची कमाई केली आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१८ आणि २०१९ या साली त्याचे नाव खेलरत्नसाठी पाठवण्यात आले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेलरत्नसाठी नीरज शिवाय कोणत्याही अ‌ॅथलेटिक्‍सचे नाव पाठवण्यात येणार नाही. ओडिशा सरकारनने धावपटू द्युती चंद हिचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे. दरम्यान, नीरजने टोकिओ ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले आहे.

हेही वाचा - जुनी लय आणि वेग परत मिळवण्यास थोडा वेळ लागेल - हिमा

हेही वाचा - 'खेलरत्न'साठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस, वाचा BCCI ने सुचवलेली नावं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.