बुडापेस्ट : नीरज चोप्राने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर भालाफेकत अंतिम फेरी गाठली. याबरोबरच त्याने आपले ऑलिम्पिकचे तिकीट पक्कं केलं आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरजनं अंतिम फेरी गाठल्यानं त्याच्या पदरी हे यश आलं आहे.
-
World Athletics Championships: Neeraj Chopra qualifies for final with 88.77m throw in first attempt
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/R10Oh3iVch#NeerajChopra #WorldAthleticsChamps pic.twitter.com/b5WIt1xhCb
">World Athletics Championships: Neeraj Chopra qualifies for final with 88.77m throw in first attempt
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2023
Read @ANI Story | https://t.co/R10Oh3iVch#NeerajChopra #WorldAthleticsChamps pic.twitter.com/b5WIt1xhCbWorld Athletics Championships: Neeraj Chopra qualifies for final with 88.77m throw in first attempt
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2023
Read @ANI Story | https://t.co/R10Oh3iVch#NeerajChopra #WorldAthleticsChamps pic.twitter.com/b5WIt1xhCb
पात्रता फेरी लिलया पार - नीरज चोप्राचा सराव पात्रता स्पर्धांमध्ये चांगलाच कामी आला आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी किमान ८५.५० मीटर लांब भालाफेक करणे अपेक्षित होते. मात्र 25 वर्षीय नीरज चोप्रानं ही पात्रता फेरी लिलया पार केली. पात्रतेसाठीच्या जागतिक मैदानी स्पर्धेत नीरज अ गटात खेळत आहे. यामध्ये नीरजने ८८.७७ मीटर लांब भालाफेक केली. गेल्या १ जुलैपासून ही पात्रता स्पर्धा येथे सुरू आहे.
अंतिम फेरीसाठी पात्रता - यापूर्वी नीरजचा वैयक्तिक सर्वोत्तम गुणांचा आकडा 89.94 गुण आहे. हे गुण त्याने 30 जून 2022 रोजी स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये मिळवले होते. ऑलिंपिक स्पर्धेतील पात्रतेचा विचार करता जे भालाफेकपटू किमान 83 मीटर लांब भाला फेकतात किंवा अ आणि ब या दोन्ही गटातील पहिल्या १२ मध्ये असतात ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
नीरजसोबत अ गटामध्ये डी पी मनू देखील आहे. तर किशोर जेना हा एकमेव भारतीय ब गटामध्ये आहे. नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तब्बल ८८.७७ मीटर लांब भालाफेक करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. किमान पात्रतेपेक्षा जास्त अंतरावर भालाफेक केल्याने नीरजने तिकीट पक्क केलं.
डी पी मनूही पात्र - डीपी मनूनेही जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. तीन प्रयत्नांमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ८१.३१ मीटर होती. ही कामगिरी त्यानं दुसऱ्या प्रयत्नात गाठली. त्याने पहिल्या प्रयत्नात ७८.१० आणि तिसऱ्या प्रयत्नात ७२.४० हे अंतरापर्यंत भालाफेक केली. या स्पर्धेचा अंतिम सामना २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
अभिनव बिंद्राची बरोबरी करेल - नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यास तो सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राची बरोबरी करेल. असे केल्याने, ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा दुसरा खेळाडू ठरेल. यापूर्वी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक तर २००६ मध्ये नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते.
हेही वाचा..
- सोशल मीडियाच्या नादात विराट कोहलीचा बीसीसीआयशी 'पंगा', होऊ शकते कारवाई; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- ICC Cricket World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी खेळाडूंपुढं मोठ्ठं आव्हान, करावी लागणार 'या' चाचण्यांची शर्यत पार
- FIDE World Cup 2023 : मॅग्नस कार्लसन 'बुद्धिबळ विश्वविजेता'; भारताच्या आर प्रज्ञानंदचा पराभव