ETV Bharat / sports

कौतुकास्पद...! रोहित पवार युवा कुस्तीपटू सोनालीच्या मदतीला धावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरची युवा कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

ncp mla rohit pawar takes responsibility young wrestler sonali mandlik
कौतुकास्पद..! रोहित पवार युवा कुस्तीपटू सोनालीच्या मदतीला धावले
author img

By

Published : Sep 2, 2020, 5:22 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरची युवा कुस्तीपटू सोनाली मंडलिकसाठी मदतीसाठी हात पुढे केला आहे. सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

सोनाली अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपरेवाडी गावात राहते. तिने 'खेलो इंडिया' स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याशिवाय तिने इतर स्पर्धांमध्ये देखील उत्तम कामगिरी करत पदकं मिळवली आहेत. पण, घरातील परिस्थितीमुळे तिला पुढे जाण्याची संधी मिळत नव्हती. सध्या ती तिच्या घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सराव करते. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते कसाबसा ५ व्यक्तींच्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.

  • सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझं बोलणंही झालं. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारलीय. यशाची अशी अनेक शिखरं ती सर करेल, असा मला विश्वास आहे. https://t.co/lLpzfVHHqA

    — Rohit Pawar (@RRPSpeaks) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपल्या मुलीने कुस्ती प्रकारातून भारताचे प्रतिनिधीत्व करावं, अशी इच्छा सोनालीच्या वडिलांची आहे. मुलीला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने ते स्वतःसाठी घर नसतानाही गोठयात राहून तिच्या खेळाची तयारी करून घेत आहेत. तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

रोहित पवार यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी सोनालीच्या संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, सोनालीने खडतर परिस्थितीमध्ये मिळवलेल्या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिच्या वडिल आणि प्रशिक्षकाशी माझं बोलणे झाले आहे. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. ती यशाची अशी अनेक शिखरं सर करेल.

दरम्यान, सोनाली फक्त कुस्तीच खेळत नाही तर ती शिक्षणही घेत आहे. कर्जत येथील महाविद्यालयात ती १२ मध्ये शिकत आहे. सोनालीला आर्थिक मदत मिळाली की ती देशाकडूनही खेळू शकते, हे समजल्यावर रोहित पवार यांनी तिची मदत केली आहे.

हेही वाचा - सेल्फी घेताना माजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा दरीत कोसळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.