ETV Bharat / sports

National Equestrian Championship : मेरठमध्ये राष्ट्रीय अश्वारोहण स्पर्धेला सोमवारपासून होणार सुरुवात - Lieutenant Colonel MM Rahman

मेरठमधील RVC सेंटर आणि कॉलेजमध्ये 25 एप्रिलपासून राष्ट्रीय अश्वारोहण ( घोडेस्वार ) चॅम्पियनशिप (इव्हेंट) आयोजित केली जाईल.

Equestrian
Equestrian
author img

By

Published : Apr 22, 2022, 4:28 PM IST

नवी दिल्ली: राष्ट्रीय अश्वारोहण (घोडेस्वार) चॅम्पियनशिप ( National Equestrian Championship ) (इव्हेंटिंग) 25 एप्रिलपासून मेरठमधील आरव्हीसी सेंटर ( RVC Center ) आणि कॉलेजमध्ये आयोजित केली जाणार आहे. इक्वेस्ट्रियन फेडरेशन ऑफ इंडियाने ( Equestrian Federation of India ) शुक्रवारी ही माहिती दिली. ही चॅम्पियनशिप 1 मे पर्यंत चालणार आहे.

ही स्पर्धा आशियाई खेळांसाठी सराव स्पर्धा देखील असणार आहे. इव्हेंटिंग हा एक घोडेस्वार इव्हेंट आहे जिथे घोडा आणि त्याचा स्वार ड्रेसेज, क्रॉस कंट्री आणि शो जंपिंगमध्ये इतर स्पर्धकांविरुद्ध स्पर्धा करतात.

या स्पर्धेत स्पर्धकांना प्रत्येक टप्प्यात पेनल्टी पॉइंट मिळतात. तसेच स्पर्धेत शेवटी ज्या घोड्याला आणि स्वाराला सर्वात कमी पॉइंट मिळतात, त्या घोडेस्वारला विजेता घोषित केले जाते. इक्वेस्ट्रियन फेडरेशन ऑफ इंडियाने येथे जारी केलेल्या प्रकाशनात, फेडरेशनचे सहसचिव लेफ्टनंट कर्नल एमएम रहमान ( Lieutenant Colonel MM Rahman ) म्हणाले, "राष्ट्रीय अश्वारोहण चॅम्पियनशिप ही अशीच एक स्पर्धा आहे. जिथे नवोदित खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घोडेस्वारांसाठीही हे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Indian Women Boxing Team : वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय महिला बॉक्सिंग संघ तुर्कीला रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.