ETV Bharat / sports

फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांची तब्येत खालावली; रुग्णालयात दाखल

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना मोहालीमधील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. . त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फ्लाइंग शिख अशी मिल्खा सिंग यांची ओळख आहे.

फ्लाइंग शीख मिल्खा सिंग
फ्लाइंग शीख मिल्खा सिंग
author img

By

Published : May 24, 2021, 8:19 PM IST

चंदीगढ - भारताचे महान आणि दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना मोहालीमधील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

फ्लाइंग शिख अशी मिल्खा सिंग यांची ओळख आहे. मिल्खा यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली होती. त्यानंतर ते घरातच क्वारंटाईन होते. आता सोमवारी अचानक त्यांची तब्येत खालावली, त्यानंतर त्याला मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. त्याच्या ऑक्सिजनची पातळी खूप कमी असल्याचे म्हटले जात आहे.

मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले.१९६०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये ते चौथ्या स्थानावर आले होते. त्यांना फ्लाइंग सिक्ख असे टोपणनाव मिळालेले आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट मिल्खा सिंग यांच्या चरित्रकथेवर आधारित आहे.मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र द रेस ऑफ माय लाइफ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.