ETV Bharat / sports

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : मेरी कोमने रचला विक्रम, भारताचे पदक पक्के - World Women's Boxing Championships

भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने गुरुवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे.

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा :मेरी कोमने रचला विक्रम, भारताचे पदक पक्के
author img

By

Published : Oct 10, 2019, 12:25 PM IST

Updated : Oct 10, 2019, 12:33 PM IST

उलान-उदे (रशिया) - भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने गुरुवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. मेरी कोमने उपांत्यपूर्व सामन्यात कोलंबियाच्या एंग्रीट वेलेन्सियाचा ५-० असा सरळ पराभव केला. या विजयासह मेरी कोमने भारतासाठी एक पदक निश्चित केले.

या कामगिरीसह मेरी कोमचे जागतिक अजिंक्यद स्पर्धेतील आठवे पदक निश्चीत झाले आहे. आता हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे ती कोणते पदक जिंकेल. दरम्यान, मेरी कोमच्या नावे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक पदकं जिंकण्याचा विक्रम आहे. तिने या स्पर्धेत यापूर्वी ६ सुवर्ण आणि एक रौप्यपदक पदक जिंकले आहे.

मेरी कोम ४८ किलो वजनी गटातून तब्बल सहा वेळा विश्वविजेती ठरली आहे. यंदा मात्र, ती पहिल्यादांच ५१ किलो वजनी गटातून स्पर्धेत उतरली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ५१ किलो वजनी गटातून तिचे हे पहिलेच पदक ठरणार आहे.

मेरी कोमने उपांत्यपूर्व सामन्यात कोलंबियाच्या वेलेन्सियाला गुण घेण्याची संधीच दिली नाही. तिच्या अचूक ताकदवान पंचसमोर वेलेन्सिया हतबल ठरली. दरम्यान, वेलिन्सियाने पॅन अमेरिका आणि रियो ऑलंम्पिक-२०१६ मध्ये कांस्य पदक जिंकले होते.

हेही वाचा - डोपिंग प्रकरणी निर्मला शेरॉनवर ४ वर्षांची बंदी, भारतावर सुवर्णदपक गमावण्याची नामुष्की

हेही वाचा - जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : भारताची जमुना बोरो उपांत्यपूर्व फेरीत

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 10, 2019, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.