नवी दिल्ली - भारताचे युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीने म्युनिच (जर्मनी) येथे चालू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी विभागात मनू भाकर-सौरभच्या जोडीने सुवर्णवेध घेतला. या विश्वचषक स्पर्धेत भारताचे हे पाचवे सुवर्णपदक ठरले.
मनू आणि सौरभ यांनी युक्रेनच्या ओलेना कोस्टेविक आणि ओलेह ओमेलचुक या जोडीला अंतिम फेरीत १७-९ असे पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर चीनच्या क्यान वांग आणि यि वांग मेंगने पोलंडच्या नतालिया क्रोल आणि जिमोन वोजित्यानाच्या जोडीला १६-१४ ने पराभूत करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले.