ETV Bharat / sports

Weightlifter Sanket Sargar : महाराष्ट्र राज्य सरकारकडून संकेत सरगरला 30 लाखाचे बक्षिस जाहीर; एकनाथ शिंदेची घोषणा - Sanket Sargar

वेटलिफ्टर संकेत सरगरच्या कामगिरीचे दखल घेत, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेतचे अभिंनदन करताना, महाराष्ट राज्य सरकारकडून संकेत सरगरला 30 लाखाचे बक्षिस जाहीर ( 30 lakh reward announced for Sanket Sargar ) केले आहे.

weightlifter Sanket Sargar
संकेत सरगर
author img

By

Published : Jul 31, 2022, 1:37 PM IST

Updated : Jul 31, 2022, 2:09 PM IST

मुंबई: शनिवारी कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत सांगलीतील चहावाल्याचा मुलगा वेटलिफ्टर संकेत सरगरने रौप्यपदक पटकात भारताला पहिले पदक मिळवून दिले. या कामगिरीनंतर संकेत सरगरच्या नावाची संपूर्ण देशात सुरु झाली आहे. वेटलिफ्टर संकेत सरगरच्या या कामगिरीचे दखल घेत, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी संकेतचे अभिंनदन करताना, महाराष्ट्र राज्य सरकारकडून संकेत सरगरला 30 लाखाचे बक्षिस जाहीर ( Maharashtra government announced reward to Sanket Sargar ) केले आहे.

वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने 55 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले ( Weightlifter Sanket Sargar won silver medal ) आहे. संकेतने 55 किलो वजनी प्रकारात 248 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकले. हे भारतासाठी सहज सुवर्णपदक ठरू शकले असते, कारण शेतकरी कुटुंबातील सरगरने चांगली सुरुवात करून आघाडी घेतली होती. क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात 135 किलो वजन उचलल्यानंतर, दोन प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्यात तो अयशस्वी ठरला. कारण त्याच्या उजव्या हाताला दुखापत ( Sanket Sargar's right hand injured ) झाली.

  • Sangli, Maharashtra | "We're very happy that he has won a silver medal for the country despite an elbow injury," says sister and father of Weightlifter Sanket Sargar

    Sanket Sargar won a silver medal in Men's 55 kg weightlifting in #CommonwealthGames2022 pic.twitter.com/KdXVJw0hay

    — ANI (@ANI) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आनंदी आहे, पण निराश देखील', संकेतने सांगितले कसे हुकले सुवर्णपदक -

सुवर्ण जिंकल्यानंतर संकेत सरगर ( weightlifter Sanket Sargar Reaction ) म्हणाला, क्लीन अँड जर्कमधील दुसऱ्या प्रयत्नात मला आवाज आला आणि वजन कमी झाले. यानंतर माझ्या प्रशिक्षकाने माझ्या हाताकडे पाहिले. मला खूप वेदना होत होत्या, पण तरीही मी तिसरी पायरी पूर्ण केली. सुवर्णपदक जिंकण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला, पण मला अपयश आले. तो पुढे म्हणाला, मला सुवर्णपदक मिळाले नाही, त्यामुळे मी निराश झालो. मी खूप प्रयत्न केले, पण दुखापतीमुळे अपयशी ठरलो. देशात सुरू असलेल्या 'आझादी का अमृत महोत्सव' या सोहळ्यासाठी मी आपले रौप्य पदक समर्पित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकतेचं बहिण काजल सरगरने खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले होते. आता संकेत सरगरचे देखील पंतप्रधानांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन थेट राष्ट्रकुल स्पर्धेत धडक ( Commonwealth Games 2022 ) दिली. त्याच्या या विजयानंतर सांगलीमध्ये सरगर कुटुंबाने आणि त्यांच्या मित्रपरिवारने जल्लोष केला.

  • Exceptional effort by Sanket Sargar! His bagging the prestigious Silver is a great start for India at the Commonwealth Games. Congratulations to him and best wishes for all future endeavours. pic.twitter.com/Pvjjaj0IGm

    — Narendra Modi (@narendramodi) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संकेत सरगर याचे वडील महादेव सरगर चहा विक्रेते ( Sanket Sargar father tea seller )आहे. शहरातला संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. सध्या ते पान टपरी आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. लवली सर्कल या ठिकाणी सरगर यांचे चहा आणि भजी विक्रीचा गाडा आहे. यातून त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सरगर दांपत्य राबतात. या जोरावरच सरगर यांनी संकेत व तिची लहान बहिण काजल या दोघांनाही खेळाचे धडे दिले आहेत.

नुकतेच हरियाणा या ठिकाणी पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ( Khelo India Youth Games ) संकेतची लहान बहिण काजल हिने सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या यशाची सर्वत्र चर्चा झाली होती. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'मन की बात'मध्ये काजल सरगर हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं कौतुक केलं होतं. त्यामुळे लहान बहिणीच्या पाठोपाठ मोठ्या भावाने देखील आई-वडिलांच्या कष्टाची चीज करून दाखवले आहे.

हेही वाचा -Commonwealth Games 2022 : चहावाल्याच्या मुलाने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिले पहिले पदक; सांगलीत जल्लोष

Last Updated : Jul 31, 2022, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.