ETV Bharat / sports

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनचे १०३ किलो लाडू तुलाने नाशिकमध्ये स्वागत, ढोल-ताशांचा दणदणाट - maharashtra kesari harshvardhan sadgir

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याची १०३ किलो मोतीचूर लाडूंची तुला करुन नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. नाशिककरांनी केलेले स्वागत पाहून हर्षवर्धन भारावला. त्याने लोकांना अभिवादन करत, पुढील लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्याचं असल्याचे सांगितले.

maharashtra kesari harshvardhan sadgir welcome in nashik
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनचे १०३ किलो लाडू तुलाने नाशिकमध्ये स्वागत, ढोल-ताशांचा दणदणाट
author img

By

Published : Jan 12, 2020, 7:13 PM IST

नाशिक - महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याची १०३ किलो मोतीचूर लाडूंची तुला करुन नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात परिसर दणाणून गेला होता. यावेळी हर्षवर्धन याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी युवा वर्गासह महिलांची झुंबळ उडाली होती.

नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगुरपर्यंत हर्षवर्धनची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विहीत गाव नाक्यावर मोतीचूर लाडूने त्याची लाडू-तुला करण्यात आली. यावेळी नाशिककर आणि पैलवान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकमध्ये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनचे जंगी स्वागत... पाहा व्हिडिओ...

नाशिककरांनी केलेले स्वागत पाहून हर्षवर्धन भारावला. त्याने लोकांना अभिवादन करत, पुढील लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्याचं असल्याचे सांगितले.

दरम्यान, नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लातूरच्या शैलशे शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली. या विजयानंतर हर्षवर्धनने उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्ती दाखवत मैत्रीचे दर्शन घडवले. दोघेही काका पवार यांचे पठ्ठे असून अंतिम लढतीत दोनही मल्लांनी जिरगबाज खेळ केला.

हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेश शेळकेवर मात केली. पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम लढतीसाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

शैलेश आणि हर्षवर्धन हे काका पवार यांच्या तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थान आणि कच्चे दुवे माहित होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. पण अती बचावात्मक कुस्ती खेळल्याने पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला.

दुसऱ्या डावातही चुरस पाहायला मिळाली. दोनही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची एकही संधी देत नव्हते. तेव्हा शेवटचे दीड मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धनला एक गुण अती बचावात्मक पद्धतीने मिळाला आणि त्याने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर शैलेशला एक गुण मिळाला.

शेवटच्या २० सेंकदात हर्षवर्धनने निर्णायक २ गुण घेत बाजी मारली आणि मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली.

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी: दोस्तीत दोस्ती कुस्तीत कुस्ती...! हे फक्त महाराष्ट्रात घडू शकतं

हेही वाचा - महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर हर्षवर्धन म्हणाला, दोघा भावांमध्ये लढत झाली...

Intro: महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरच आज नाशिकमध्ये ढोल ताशाच्या तालावर नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आल. नाशिकरोड वरील जिजाऊ माता आणि शिवाजी महाराजांच्या पूतळ्याला अभिवादन करून नाशिकरोडपासून भगूरपर्यंत मिरवणूक काढण्यात आलीBody:विहीतगाव नाकयावर 103 किलो मोतीचूर लाडूने त्याची लाडूतुला करण्यात आली यावेळी नाशिककर आणि पैलवान मंडळी मोठ्या संख्येने उपथित होते. हा सर्व जल्लोष बघून हर्षवर्द्धन भारावून गेला असून यापुढील स्वप्न आता ओलम्पिक असल्याच त्याने म्हंटलय. Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.