ETV Bharat / sports

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरच्या पैलवानांनी गाजवला दिवस, वाचा सर्व निकाल एका क्लिकवर...

author img

By

Published : Jan 5, 2020, 9:27 PM IST

गादी विभागातील ७० किलो वजनी गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकरने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर ११-५ गुणांनी सहज विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.

maharashtra kesari 2020 sunday all results, 70,86 and 92 kg group gold win solapur wrestler
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या पहिलवानांनी गाजवला दिवस, वाचा सर्व निकाल एका क्लिकवर...

पुणे - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमनोरा तर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या म्हळूंगे-बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहेत. या स्पर्धेत आजचा (रविवार ) दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पहिलवानांनी. ज्यात कालीचरण सोलनकर (७० किलो गादी), वेताळ शेळके (८६ किलो गादी), शुभम चव्हाण (९२ किलो माती) यांनी सुवर्ण पदक जिंकले.

गादी विभागातील ७० किलो वजनी गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकरने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर ११-५ गुणांनी सहज विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखवर १५-३ ने सहज विजय मिळवत कांस्य पदक जिंकले. याच गटाच्या कांस्य पदकाच्या दुसर्‍या लढतीत पिंपरी चिंचवडच्या योगेश्वर तापकिरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीवर १०-० अशा तांत्रिक गुणधिक्याने विजय मिळवला.

७० किलो गादी विभाग - अंतिम निकाल

  • सुवर्ण - कालीचरण सोलनकर (सोलापूर जिल्हा)
  • रौप्य - दिनेश मोकाशी (पुणे जिल्हा)
  • कांस्य - विकास गोरे (अहमदनगर जिल्हा)
  • कांस्य - योगेश्वर तापकिर (पिंपरी-चिंचवड)

८६ किलो गादी विभागात सोलापूर जिल्ह्याच्या वेताळ शेळकेने जालन्याच्या बाबासाहेब चव्हाणवर ८-० गुणांनी विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. बाबासाहेब चव्हाण यांनी औरंगाबाद शहराच्या संदेश डोंगरेवर ७-१ ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसर्‍या उपांत्य फेरीत वेताळ शेळके सोलापूर व रमेश कुकडे यांच्यात लढत झाली. वेताळ शेळके यांनी ५-० गुण घेत अंतिम फेरी गाठली. धुळ्याच्या हर्षल गवते व रमेश कुकडे यांनी कांस्य पदक पटकावले.

८६ किलो गादी विभाग - अंतिम निकाल

  • सुवर्ण - वेताळ शेळके (सोलापूर जिल्हा)
  • रौप्य - बाबासाहेब चव्हाण (जालना जिल्हा)
  • कांस्य - हर्षल गवते (धुळे जिल्हा)
  • कांस्य - रमेश कुकडे (नाशिक जिल्हा)

९२ किलो माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या शुभम चव्हाणने सातार्‍याच्या जयदीप गायकवाडवर ८-० ने मात करून सुवर्ण पदक प्राप्त केले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत बीडच्या अमोल मुंडेने लातूरच्या प्रदीप काळेला चितपट केले.

९२ किलो माती विभाग - अंतिम निकाल

  • सुवर्ण - शुभम चव्हाण (सोलापूर जिल्हा)
  • रौप्य - जयदीप गायकवड (सातारा)
  • कांस्य - अमोल मुंडे (बीड)

महाराष्ट्र केसरी खुल्या गटाच्या गादी विभागातील तिसर्‍या फेरीत मुंबई उपनगरच्या सचिन येलभरने कोल्हापूर शहराच्या समिर देसाईवर चुरसीने ५-२ ने विजय मिळविला. तर सातार्‍याच्या प्रवीण सरकने वर्ध्याच्या संतोष जगतापला ७-० गुणांनी सहज हरवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगिरने मुंबई उपनगरच्या संतोष गायकवाडला ५-२ ने हरविले.

कोल्हापूर शहराचा संग्राम पाटील व वाशिमच्या सुनील शेवतकर यांनी अतिशय गतिमान व चपळाईने लढत करत २-१ ने संग्राम विजयी ठरला. पुणे जिल्ह्याच्या आदर्श गुंडने सहजपणे रायगडच्या कुलदीप पाटीलवर तांत्रिक गुणधीक्याने सहज विजय मिळविला. तसेच लातूरच्या सागर बिराजदारने अमरावतीच्या गुलाब आगरकर वर ४-१ ने विजय मिळवला.

पुणे शहराच्या अभिजीत कटकेला सोलापूरच्या योगेश पवारने अतीतटीची झुंज दिली. अभिजीतने या लढतीत ६-० गुणांनी विजय मिळवत घोडदौड सुरू ठेवली. तिसर्‍या फेरीतील गादी विभागाची अखेरची लढतीत सोलापूरच्या अक्षय मंगवडेने अहमदनगरच्या विष्णु खोसेवर ४-३ गुणांनी विजय मिळविला.

महाराष्ट्र केसरी खुल्या गटाच्या माती विभागातील तिसर्‍या फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडने नांदेडच्या नयनेश निकमवर १०-० तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळवला. लातूरच्या शैलेश शेळके व मुंबई पश्चिमच्या भारत मदने यांच्यात अत्यंत चुरसीची लढत झाली. मागील ५ वर्षापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे खेळाडू भारतला अनपेक्षितरीत्या चितपट करत शैलेशने विजय मिळवला आणि स्पर्धेतील आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली.

हिंगोलीचे गणेश जगताप याने गोंदियाच्या दत्तात्रय नरळे यावर ७-० ने विजय मिळवला. वाशिमचा शिकंदर शेखने अहमदनगरच्या सागर मोहळकरवर तांत्रिक गुणाधीक्याने विजय मिळवला. तर बुलढण्याच्या बाला रफिक शेखने वर्ध्याच्या उमेश शिरोडेला हफ्ते डावावर चितपट विजय मिळवला.

पुणे शहराच्या तानाजी झुंजुरके व जालनाच्या विलास डोईफोडे यांच्यात रोमांचक लढत झाली. तानाजीने विलासला लपे डावाने चितपट करत विजय मिळवला. तसेच मुंबई पूर्वच्या संदीप काळेने नाशिक जिल्ह्याच्या पोपट घोडकेवर तर सोलापूरच्या ज्ञानेश्वर उर्फ माउली जमदाडे याने सोलापूर शहराच्या धीरज सरवदेवर चितपट विजय मिळवला.

Intro:महाराष्ट्र केसरीत रविवारचा दिवस सोलापूर जिल्ह्याचा..!

पुणे दि. ५ जानेवारी २०२० : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमनोरा तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या म्हळूंगे-बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. आजचा दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पहिलवानांनी. ज्यात कालीचरण सोलनकर (७० किलो गादी), वेताळ शेळके (८६ किलो गादी), शुभम चव्हाण (९२ किलो माती) यांनी सुवर्ण पदक जिंकले.

गादी विभागातील ७० किलो वजनी गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकर याने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर ११-५ गुणांनी सहज विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखवर १५-३ ने सहज विजय मिळवत कांस्य पदक जिंकले. याच गटाच्या कांस्यपदकाच्या दुसर्‍या लढतीत पिंपरी चिंचवडच्या योगेश्वर तापकिरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीवर १०-० अशा तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळवला.

७० किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण - कालीचरण सोलनकर (सोलापूर जि.)
रौप्य - दिनेश मोकाशी (पुणे जि.)
कांस्य - विकास गोरे (अहमदनगर)
कांस्य - योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड)

८६ किलो गादी विभागात सोलापूर जिल्हयाच्या वेताळ शेळकेने जालन्याच्या बाबासाहेब चव्हाण वर ८-० गुणांनी विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. बाबासाहेब चव्हाण यांनी औरंगाबाद शहराच्या संदेश डोंगरेवर ७-१ ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसर्‍या उपांत्य फेरीत वेताळ शेळके सोलापूर व रमेश कुकडे यांच्यात लढत झाली. वेताळ शेळके यांनी ५-० गुण घेत अंतिम फेरी गाठली. धुळ्याच्या हर्षल गवते व रमेश कुकडे यांनी कांस्य पदक पटकावले.

८६ किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – वेताळ शेळके (सोलापूर जि.)
रौप्य – बाबासाहेब चव्हाण (जालना)
कांस्य – हर्षल गवते (धुळे)
कांस्य - रमेश कुकडे (नाशिक जि.)

९२ किलो माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या शुभम चव्हाणने सातार्‍याच्या जयदीप गायकवडवर ८-० ने मात करून सुवर्ण पदक प्राप्त केले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत बीडच्या अमोल मुंडेने लातूरच्या प्रदीप काळेला चितपट केले.

९२ किलो माती विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण - शुभम चव्हाण (सोलापूर जि.)
रौप्य - जयदीप गायकवड (सातारा)
कांस्य - अमोल मुंडे (बीड)

दिवसभरात महाराष्ट्र केसरी खुल्या गटाची दुसरी व तिसरी फेरी पार पडली.

महाराष्ट्र केसरी खुल्या गटाच्या गादी विभागातील तिसर्‍या फेरीत मुंबई उपनगरच्या सचिन येलभरने कोल्हपुर शहराच्या समिर देसाई वर चुरसीने ५-२ ने विजय मिळविला. तर सातार्‍याच्या प्रवीण सरकने वर्ध्याच्या संतोष जगतापला ७-० गुणांनी सहज हरवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगिरने मुंबई उपनगरच्या संतोष गायकवाडला ५-२ ने हरविले. कोल्हापूर शहराचा संग्राम पाटील व वाशिमच्या सुनील शेवतकर यांनी अतिशय गतिमान व चपळाईने लढत करत २-१ ने संग्राम विजयी ठरला. पुणे जिल्ह्याच्या आदर्श गुंडने सहजपणे रायगडच्या कुलदीप पाटीलवर तांत्रिक गुणधीक्याने सहज विजय मिळविला. तसेच लातूरच्या सागर बिराजदारने अमरावतीच्या गुलाब आगरकर वर ४-१ ने विजय मिळवला. पुणे शहराच्या अभिजीत कटकेला सोलापूरच्या योगेश पवारने अतीतटीची झुंज दिली. यावेळी ६-० गुणांनी अभिजीतने विजय मिळवत पुढच्या फेरीत घोडदौड सुरू ठेवली. तिसर्‍या फेरीतील गादी विभागाची अखेरची लढतीत सोलापूरच्या अक्षय मंगवडे याने अहमदनगरच्या विष्णु खोसेवर ४-३ गुणांनी विजय मिळविला.

Body:दिवसभरात महाराष्ट्र केसरी खुल्या गटाची दुसरी व तिसरी फेरी पार पडली.

Conclusion:महाराष्ट्र केसरी खुल्या गटाच्या माती विभागातील तिसर्‍या फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडने नांदेडच्या नयनेश निकमवर १०-० तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळवला. लातूरच्या शैलेश शेळके व मुंबई पश्चिमच्या भारत मदने यांच्यात अत्यंत चुरसीची लढत झाली. मागील ५ वर्षापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे खेळाडू भारतला अनपेक्षितरीत्या चितपट करत शैलेशने विजय मिळवला आणि स्पर्धेतील आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली. हिंगोलीचे गणेश जगताप याने गोंदियाच्या दत्तात्रय नरळे यावर ७-० ने विजय मिळवला. वाशिमचा शिकंदर शेखने अहमदनगरच्या सागर मोहळकरवर तांत्रिक गुणाधीक्याने विजय मिळवला. तर बुलढण्याच्या बाला रफिक शेखने वर्ध्याच्या उमेश शिरोडेला हफ्ते डावावर चितपट विजय मिळवला. पुणे शहराच्या तानाजी झुंजुरके व जालनाच्या विलास डोईफोडे यांच्यात रोमांचक लढत झाली. तानाजीने विलासला लपे डावाने चितपट करत विजय मिळवला. तसेच मुंबई पूर्वच्या संदीप काळेने नाशिक जिल्ह्याच्या पोपट घोडकेवर तर सोलापूरच्या ज्ञानेश्वर उर्फ माउली जमदाडे याने सोलापूर शहराच्या धीरज सरवदेवर चितपट विजय मिळवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.