नवी दिल्ली - भारताचा विक्रमवीर अमित पांघलने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास घडवत रौप्य पदक पटकावले. त्याला अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या एस. झोइरोव्हकडून पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर 'मला पुरस्कारापेक्षा पदके आवडतात', अशी प्रतिक्रिया पांघलने दिली आहे.
हेही वाचा - IND VS SA : अखेरच्या सामन्यावर पावसाचे सावट...
पांघलने या सामन्यानंतर एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. 'मला सुवर्णपदकाची आशा होती मात्र, काहीतरी कमतरता होती जी सामन्यात दिसली. पुढे या सर्व गोष्टींवर काम करेन. उझबेकिस्तानच्या या खेळाडूला आम्ही ऑलिम्पिकमध्ये चांगली लढत देऊ. मला पुरस्कारापेक्षा देशासाठी पदके जिंकलेली आवडतात.' असे पांघलने म्हटले आहे.
-
#SilverMedal #AIBAWorldBoxingChampionships #yekatrinburg #Russia देश वासियों के प्यार बना रहे।🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद। pic.twitter.com/W0KMtOS5P8
— Amit Panghal (@Boxerpanghal) September 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#SilverMedal #AIBAWorldBoxingChampionships #yekatrinburg #Russia देश वासियों के प्यार बना रहे।🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद। pic.twitter.com/W0KMtOS5P8
— Amit Panghal (@Boxerpanghal) September 21, 2019#SilverMedal #AIBAWorldBoxingChampionships #yekatrinburg #Russia देश वासियों के प्यार बना रहे।🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद। pic.twitter.com/W0KMtOS5P8
— Amit Panghal (@Boxerpanghal) September 21, 2019
अमितच्या या पराभवाबरोबर त्याचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत पांघलने केलेली ही कामगिरी आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आली नव्हती.
रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या झोइरोव्हने अमितचा ५-० ने एकतर्फी पराभव केला. दरम्यान, यंदाची विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा भारताच्या बॉक्सरपटूंसाठी महत्वाची ठरली. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. अमितने तर आपल्या कारकिर्दीमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला.
याआधी विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताकडून विजेंदर सिंह, विकास कृष्णन, शिवा थापा, गौरव बिधुरी या खेळाडूंनी कांस्यपदकाची कमाई केली होती. यंदाच्या यंदाच्या स्पर्धेत भारताच्या मनिष कौशलने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर अमित पांघलने रौप्य जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, अद्याप भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे.