सिल्व्हरस्टोन - मर्सिडीज संघाचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने कारकिर्दीतील विक्रमी सातवी ब्रिटिश ग्रां.प्री. शर्यत जिंकली. शेवटच्या लॅपमध्ये टायर पंक्चर झाल्यानंतरही हॅमिल्टनने विजेतेपद मिळवले. या विजयासह, हॅमिल्टन फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 30 गुणांनी आघाडीवर आहे. पोल पोजिशनवरून शर्यतीची सुरुवात केली.
-
A dramatic final minute at Silverstone, as @LewisHamilton and his Mercedes hold on for a famous victory! 😮 🏆#BritishGP 🇬🇧 #F1 pic.twitter.com/CmD8hrz2Fw
— Formula 1 (@F1) August 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A dramatic final minute at Silverstone, as @LewisHamilton and his Mercedes hold on for a famous victory! 😮 🏆#BritishGP 🇬🇧 #F1 pic.twitter.com/CmD8hrz2Fw
— Formula 1 (@F1) August 2, 2020A dramatic final minute at Silverstone, as @LewisHamilton and his Mercedes hold on for a famous victory! 😮 🏆#BritishGP 🇬🇧 #F1 pic.twitter.com/CmD8hrz2Fw
— Formula 1 (@F1) August 2, 2020
या शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे स्थान राखले. त्याने हॅमिल्टनपेक्षा सहा सेकंद अधिक घेतले. फेरारीचा चार्ल्स लेक्लर्क तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हॅमिल्टनचा संघसहकारी वाल्टेरी बोटासच्याही गाडीचाही टायर पंक्चर झाला. त्याला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
शेवटच्या क्षणी हॅमिल्टन त्याचा जोडीदार बोटास बरोबर दुसऱ्या क्रमांकावर होता. पण जेव्हा तीन लॅप्स बाकी होते तेव्हा त्याचा टायर पंक्चर झाला. काही दिवसांपूर्वी, ब्राझील, कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेतील फॉर्म्युला वन शर्यती कोरोनाच्या उद्रेकामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी कॅलेंडरमध्ये तीन नवीन शर्यती जोडल्या गेल्या आहेत.