हैदराबाद: खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 सध्या बेंगळुरूमध्ये सुरू आहेत. आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी आस्था पाहवा ( Boxer Aastha Pahwa ) हिने मुलींच्या बॉक्सिंगच्या 63-66 लाइट वेल्टरवेट प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. चौधरी चरणसिंग युनिव्हर्सिटीकडून खेळणाऱ्या आस्थाने अंतिम फेरीत सिव्हीचा पराभव केला.
आस्था ही उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Union Sports Minister Anurag Thakur ) देखील आस्थाच्या विजयाने खूप प्रभावित झाले आहेत. त्यांनी ट्विट केले की, “कष्टाचे फळ नेहमीच मिळते. आस्थाने 63-66 किलो वेल्टरवेट प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
-
Hard work always pays off. 🥊 Astha Pahwa won her GOLD 🥇here at #KIUG2021 in Boxing (63- 66 Kg).@BFI_official@kheloindia @IndiaSports pic.twitter.com/H1IGapePhO
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hard work always pays off. 🥊 Astha Pahwa won her GOLD 🥇here at #KIUG2021 in Boxing (63- 66 Kg).@BFI_official@kheloindia @IndiaSports pic.twitter.com/H1IGapePhO
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) April 28, 2022Hard work always pays off. 🥊 Astha Pahwa won her GOLD 🥇here at #KIUG2021 in Boxing (63- 66 Kg).@BFI_official@kheloindia @IndiaSports pic.twitter.com/H1IGapePhO
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) April 28, 2022
28 एप्रिल रोजी झालेल्या इतर बॉक्सिंग सामन्यांबद्दल सांगायचे तर, सासन गिल आणि दीपक आपापल्या वजनीगटात सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरले. सध्या, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 ( Khelo India University Games 2021 ) मध्ये यजमान जैन विद्यापीठ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. जैन विद्यापीठाने आतापर्यंत 13 सुवर्णांसह 20 पदके जिंकली आहेत. यानंतर पंजाब विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा क्रमांक लागतो.
धावपटू दुती चंद ( Runner Duti Chand ), जलतरणपटू श्रीहरी नटराज, मनू भाकर, दिव्यांश सिंग पनवार, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर या ऑलिंपियनचाही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये समावेश आहे. सुमारे 35 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 20 खेळांचे आयोजन केले जात आहे, ज्यासाठी 275 सुवर्णपदके पणाला लावली जाणार आहेत. 3 मे रोजी होणाऱ्या समारोप समारंभाला गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah ) देखील उपस्थित राहू शकतात.
-
Medals Tally 🏅 Khelo India University Games 2021#KheloIndia | #KIUG2021 pic.twitter.com/MxPDz1PZjT
— Doordarshan Sports (@ddsportschannel) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Medals Tally 🏅 Khelo India University Games 2021#KheloIndia | #KIUG2021 pic.twitter.com/MxPDz1PZjT
— Doordarshan Sports (@ddsportschannel) April 28, 2022Medals Tally 🏅 Khelo India University Games 2021#KheloIndia | #KIUG2021 pic.twitter.com/MxPDz1PZjT
— Doordarshan Sports (@ddsportschannel) April 28, 2022
या खेळांना हरित खेळ ( Green Sports ) बनवण्यासाठी कर्नाटक राज्याने पर्यावरणपूरक व्यवस्था सुनिश्चित केली आहे. त्याअंतर्गत 'झिरो वेस्ट' आणि 'झिरो प्लास्टिक' हेतूने व्यवस्था करण्यात आली आहे. या खेळांचा पहिला हंगाम फेब्रुवारी 2020 मध्ये भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 158 विद्यापीठांमधील 3182 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्या हंगामात पंजाबने 17 सुवर्ण पदकांसह 46 पदके जिंकून चॅम्पियन ठरला होता.
हेही वाचा - Badminton Asia Championships : सिंधू, सात्विक आणि चिराग उपांत्यपूर्व फेरीत, सायना आणि श्रीकांत बाहेर