पालघर - दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत वसई-विरारच्या १४ खेळाडूंची निवड झाली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ११७ खेळाडूंचा सहभाग होता. शिवाय, जगभरातून एकूण ९ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
हेही वाचा - Women t20 WC : भारताची गाडी सुसाट, श्रीलंकेला नमवले
वाकोच्या मान्यतेने या स्पर्धा घेण्यात आल्या. वसई-विरारच्या मुला-मुलींनी विविध क्रीडा प्रकारात १९ सुवर्ण, ६ रजत आणि ५ कांस्य अशा एकूण ३० पदकांची लयलूट केली. याच स्पर्धेमध्ये आयोजित ओपन ग्रँड चॅम्पियनशिपच्या वरिष्ठ गटात सायली कानत तर कनिष्ठ गटात सानवी पाटील या दोघी विजेत्या ठरल्या. त्यांना प्रत्येकी २०० युरोचे पारितोषिक मिळाले आहे.
विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू प्रशिक्षक सूर्यप्रकाश मुंडापाट यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत आहेत. तसेच सायली कानत, सागर भोईर व सिद्धांत मुंडापाट यांनीही या खेळाडूंच्या यशात सिंहाचा वाटा उचलला आहे.
पदक विजेत्यांची नावे -
- स्मित गंगीकर (एम.जी. परुळेकर स्कूल) - ३ सुवर्ण
- स्टीयाना वेसावकर (कार्मेलाईट इंग्शिल हायस्कूल) - २ सुवर्ण, १ कांस्य
- वेल्मा रेमेडीयस (कॉन्व्हेंट ऑफ जिजस अॅण्ड मेरी हायस्कूल) - १ सुवर्ण, १ रजत, १ कांस्य
- शौर्य मुंडापाट (ट्री हाऊस हायस्कूल) - १ सुवर्ण, १ कांस्य
- सानवी पाटील (आयझॅक न्युटन ग्लोबल स्कूल) - २ सुवर्ण, २ रजत
- रेहान शेख (सेंट अॅकन्थॉनिज कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल) - १ सुवर्ण, १ कांस्य
- प्रियल पाटील (कार्मेलाईट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल) - २ रजत
- सायली कानत (ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्स) - ३ सुवर्ण
- अथर्व पेटकर (एस.के.सि.कॉलेज) - १ रजत
- राहुल कुबत्तीया (भाऊसाहेब वर्तक पॉलिटेकनिक) १ सुवर्ण
- सिद्धांत मुंडापाट (गोन्सालो गार्सिया कॉलेज) - २ सुवर्ण
- फेबीयन डिसिल्वा (इंटरन्स परीक्षेच्या तयारीत) - १ सुवर्ण
- इयान रॉड्रिग्ज (सेंट फ्रान्सिस इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी) - १ सुवर्ण
- सागर भोईर (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परीवहन उपक्रम) - १ सुवर्ण, १ कांस्य