ETV Bharat / sports

Khelo India Youth Games : खेलो इंडिया युवा स्पर्धेवर महाराष्ट्राचे वर्चस्व; 9 सुवर्ण पदकांची कमाई - खेलो इंडिया युवा स्पर्धा मराठी बातमी

खेलो इंडिया युवा स्पर्धेत ( Khelo India Youth Games ) महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 9 सुवर्ण पदकांची कमाई केली ( Maharashtra Shoot Into Lead With 9 Gold ) आहे. 5 सुवर्ण पदके जिंकत हरयाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Khelo India Youth Games
Khelo India Youth Games
author img

By

Published : Jun 6, 2022, 7:38 PM IST

हरयाणा - खेलो इंडिया युवा स्पर्धेत ( Khelo India Youth Games ) महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 9 सुवर्ण पदकांची कमाई केली ( Maharashtra Shoot Into Lead With 9 Gold ) आहे. 5 सुवर्ण पदके जिंकत हरयाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य अशा 17 पदकांवर आपले नाव कोरले आहे. तर, 5 सुवर्ण, 6 रौप्य, 12 कांस्य अशी 23 पदके हरयाणाच्या खेळाडूंनी जिंकली आहेत.

महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये 4 पैकी 3 सुवर्ण, योगात 3 आणि सायकलिंगमध्ये 1 सुवर्णपदक मिळवलं आहे. तर, हरयाणाने मॅटवरच्या कुस्तीत आपले वर्चस्व दाखवले आहे. त्यांनी कुस्तीत पाचही आणि सायकलिंमध्ये 1 सुवर्णपदक मिळवलं आहे. तसेच, पहिल्यांदा खेलो इंडियामध्ये खेळवले जात असलेल्या थांग ता या खेळामध्ये मणिपुरने चार सुवर्ण पदके जिंकत तिसऱ्या स्थान गाठले आहे. आठ पदकांची कमाई करत पंजाब चौथ्या तर चार पदकांसह चंडीगढ पाचव्या स्थानावर आहे.

दोन खेळाडूंनी केले राष्ट्रीय विक्रम - महाराष्ट्राची वेटलिफ्टर हर्षदा गरुड हिने खेलो इंडियात महिलांच्या 45 किलो वजनी गटात नवा विक्रम केला आहे. तिने क्लीन अँड जर्कमध्ये 83 किलो वजन उचलून नवा विक्रम केला आहे. हर्षदाला उत्तरप्रदेशच्या अंजलीचे कडवे आव्हान होते. अंजलीने 80 किलोचे वजन उचलले होते. त्याशिवाय तामिळनाडूच्या एल धनुषने 49 किलो वजनी गटात खेळाताना 88 किलो वजनाचा नवा विक्रम केला. त्याने एकूण 190 किलो वजन उचलले आहे.

हेही वाचा - MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीची 'गरुडा'त गुंतवणूक; कंपनीचे ब्रँडिंग देखील करणार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.