ETV Bharat / sports

Kapil Dev Viral video : कपिल देवचं कथित अपहरण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल, काय आहे सत्य? - गौतम गंभीर

सोशल मीडियावर क्रिकेटपटू कपिल देवचा कथित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक हे कपिल देव नसल्याचे सांगत आहेत. तर त्याचवेळी काही लोकांनी या व्हिडिओबाबत क्रिकेटपटू गौतम गंभीरला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.

Kapil Dev Viral video
Kapil Dev Viral video
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 8:17 PM IST

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज आणि भाजपा खासदार गौतम गंभीरनेही ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन लोक कपिल देव यांच्या तोंडाला कापड बांधून त्यांना एका ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून कपिल देव यांचे अपहरण झाल्याचा संशय भाजपा खासदार गौतम गंभीरनं केला.

क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक्स या सोशल मीडियावर कपिल देवचा कथित व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ही क्लिप आणखी कोणाला मिळाली का? असं घडलं नसावं, अशी आशा आहे. कपिल देव ठीक आहेत. गंभीरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत. व्हिडिओमध्ये कपिल देव आहेत की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कपिल देव असला तरी कदाचित ते कोणत्यातरी जाहिरातीचे शूटिंग करत असावेत, असा क्रिकेट चाहत्यांचा अंदाज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल देवचे मॅनेजर राजेश पुरी यांनी व्हिडिओ हा जाहिरातीचा भाग असल्याचं म्हटलं आहे.

  • Earlier Harsha Bhogle and today Gautam Gambhir along with Kapil Dev,
    Such ad campaigns making mockery of everything should be stopped before people start taking even serious mishap like jokes. pic.twitter.com/i57KdtQd0P

    — feryy (@ffspari) September 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वापरकर्त्यांनी गौतम गंभीरला केले ट्रोल- नीलम चौधरी नावाच्या एका वापरकर्त्यानं लिहिले, जर तुम्ही हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओमध्ये क्रिकेटर कपिल नाही. तर अशा चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करू नका? अझीम काशी नावाच्या वापरकर्त्यानं लिहिले, शूटिंग स्पॉटचा व्हिडिओ लीक झाला! मोइदीन भाई हे कपिल देव वाचवणार आहेत. काही अनपेक्षित घडणार असल्याची अपेक्षा करा. फेरी नावाच्या वापरकर्त्याने लिहिले, आधी हर्षा भोगले आणि आज गौतम गंभीरनं कपिल देव यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या विनोदाला खरेखुरे अपहरण समजण्यापूर्वी अशा जाहिरातबाजी बंद व्हायला हव्यात. फोन करून विचारा, असा गंमतीशीर सल्ला देत अनेक वापकरत्यांनी गौतम गंभीरला ट्रोलदेखील केले.

हेही वाचा-

  1. Gambhir on Dhoni : धोनीबाबत गौतम गंभीरचं आणखी एक मोठं वक्तव्य; म्हणाला, 'धोनीमुळे रोहित शर्मा...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.