नवी दिल्ली: भारताच्या स्वप्नील कुसळेने गुरुवारी पहाटे अझरबैजानच्या बाकू येथे आयएसएसएफ विश्वचषक रायफल/पिस्तूल/शॉटगन पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन (3P) स्पर्धेत रौप्य पदक ( Swapnil Kusale Won Silver Medal ) आपल्या नावे केले आहे. त्यामुळे भारताला स्पर्धेतील दुसरे पदक मिळाले आहे.
26 वर्षीय स्वप्नीलने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील ( ISSF World Cup ) पहिले वैयक्तिक पदक जिंकले आहे. रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि टोकियो ऑलिम्पिक फायनलमधील युक्रेनच्या सेर्ही कुलिशकडून सुवर्णपदकाच्या लढतीत त्याला 10-16 असा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या 12 सदस्यीय रायफल संघात भारताकडे आता एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक आहे, जे एका रात्रीत पदकतालिकेत नवव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचले आहे.
-
2nd 🏅 for INDIA @KusaleSwapnil bags silver medal at @ISSF_Shooting World Cup 2022, Baku in Men's 50m Rifle 3 Positions 🔥🔥
— SAI Media (@Media_SAI) June 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Swapnil scored 409.1 to clinch silver 🥈
Many congratulations Champ 🎊 #IndianSports #Shooting pic.twitter.com/0cjpv83nSd
">2nd 🏅 for INDIA @KusaleSwapnil bags silver medal at @ISSF_Shooting World Cup 2022, Baku in Men's 50m Rifle 3 Positions 🔥🔥
— SAI Media (@Media_SAI) June 2, 2022
Swapnil scored 409.1 to clinch silver 🥈
Many congratulations Champ 🎊 #IndianSports #Shooting pic.twitter.com/0cjpv83nSd2nd 🏅 for INDIA @KusaleSwapnil bags silver medal at @ISSF_Shooting World Cup 2022, Baku in Men's 50m Rifle 3 Positions 🔥🔥
— SAI Media (@Media_SAI) June 2, 2022
Swapnil scored 409.1 to clinch silver 🥈
Many congratulations Champ 🎊 #IndianSports #Shooting pic.twitter.com/0cjpv83nSd
जागतिक दर्जाच्या मैदानावर दोन दिवसांच्या खडतर स्पर्धेमध्ये स्वप्नीलने जबरदस्त 3P सामना खेळला. त्याने गुरुवारच्या टॉप-आठ रँकिंग फेरीत कुलिशच्या मागे दुसरे स्थान मिळविले, त्यानंतर सुवर्णपदकाच्या लढतीत युक्रेनियन चॅम्पियन्सकडून पराभव पत्करावा लागला. रँकिंग फेरीत कुलिशने 411 आणि स्वप्नीलने 409.1 गुण मिळवले, तर फिनलंडच्या अलेक्सीने 407.8 गुणांसह कांस्यपदक मिळवले.
हेही वाचा - Deepak Chahar Wedding : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर चढला बोहल्यावर