नवी दिल्ली : आयपीएल 2023 च्या 16व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामात काही नवीन नियम करण्यात आले आहेत. या नियमांच्या निर्मितीमुळे संघांचे कर्णधार आणि खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे. नवीन नियमांनुसार खेळाडू 'नो बॉल आणि वाईड बॉल'साठीही डीआरएस घेऊ शकतील. मैदानावरील पंचाच्या नजरेतून वाइड आणि नो बॉल टाळणे कठीण असते. असे असले तरी अंपायरकडून चूक झाल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्यासाठी खेळाडूंमध्ये उत्साह आहे.
यष्टीरक्षकावर आता असणार लक्ष : अनेकवेळा यष्टीरक्षक फलंदाजांना त्रास देण्यासाठी विचित्र गोष्टी करीत असल्याचे सामन्यादरम्यान दिसून आले आहे. त्यासाठी नवा नियमही करण्यात आला आहे. यावेळी यष्टिरक्षकांवरसुद्धा नजर असणार आहे. यष्टीमागे कोणताही यष्टिरक्षक 'अयोग्य कृती' करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. फलंदाजाने चेंडू मारण्यापूर्वी यष्टिरक्षकाने विनाकारण हालचाल केल्यास ते 'अयोग्य कृती' मानले जाणार आहे.
-
𝐓𝐡𝐞 #𝐓𝐀𝐓𝐀𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟑 𝐒𝐭𝐚𝐫𝐭𝐬 𝐓𝐨𝐝𝐚𝐲!
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Home & away challenge, interesting new additions and the return of packed crowds 🙌🏻
Hear from the captains ahead of an incredible season 👏🏻👏🏻 - By @Moulinparikh
WATCH the Full Video 🎥🔽 https://t.co/BaDKExCWP1 pic.twitter.com/jUeTXNnrzU
">𝐓𝐡𝐞 #𝐓𝐀𝐓𝐀𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟑 𝐒𝐭𝐚𝐫𝐭𝐬 𝐓𝐨𝐝𝐚𝐲!
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
Home & away challenge, interesting new additions and the return of packed crowds 🙌🏻
Hear from the captains ahead of an incredible season 👏🏻👏🏻 - By @Moulinparikh
WATCH the Full Video 🎥🔽 https://t.co/BaDKExCWP1 pic.twitter.com/jUeTXNnrzU𝐓𝐡𝐞 #𝐓𝐀𝐓𝐀𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟑 𝐒𝐭𝐚𝐫𝐭𝐬 𝐓𝐨𝐝𝐚𝐲!
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
Home & away challenge, interesting new additions and the return of packed crowds 🙌🏻
Hear from the captains ahead of an incredible season 👏🏻👏🏻 - By @Moulinparikh
WATCH the Full Video 🎥🔽 https://t.co/BaDKExCWP1 pic.twitter.com/jUeTXNnrzU
संथ षटकांवर दंड आकारला जाईल : टी-20 सामन्यांदरम्यान, सामने खूपच रोमांचक होतात. अशा स्थितीत खेळाडूंना निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे सामना वेळेवर संपत नाही. प्रत्येक संघाला २० षटके ९० मिनिटांत पूर्ण करायची आहेत. या हंगामात, 90 मिनिटांनंतर जे काही ओव्हर होईल, 30 यार्डच्या मैदानात एक अतिरिक्त खेळाडू ठेवावा लागेल.
नाणेफेक झाल्यानंतरसुद्धा होणार प्लेइंग 11 ची घोषणा : नाणेफेक झाल्यानंतरही कर्णधार प्लेइंग 11 ची घोषणा करू शकेल. संघात 11 खेळाडूंशिवाय 5-5 पर्यायी खेळाडू असतील. यातील एका खेळाडूला सामन्यादरम्यान केव्हाही मैदानात उतरवले जाऊ शकते. याला इम्पॅक्ट प्लेअर नियम म्हणतात. या नियमामुळे सर्व संघांना एकप्रकारे वेगळेच चैतन्य निर्माण होणार आहे. त्याचबरोबर प्लेअर्सच्या फिटनेसमुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत होते. त्यावर आता या नियमामुळे मोठा फायदा होणार आहे. संघाच्या कर्णधारांना याचा फायदा झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : First Match of Tata IPL : संध्याकाळ पासून रंगणार आयपीएलचा थरार ; नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार पहिली लढत