ETV Bharat / sports

IPL 2023 : महेंद्रसिंह धोनी विरुद्ध हार्दिक पंड्या; आज पहिली लढत सीएसके-गुजरात टायटन्समध्ये - गुजरात टाइटंस

आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात महेंद्र सिंह धोनी खेळणार नसल्याच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. धोनी या सामन्यासाठी फिट आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

IPL 2023  Mahendra Singh Dhoni vs Hardik Pandya Gujarat Titans vs Chennai Super Kings
आज महेंद्र सिंह धोनी विरुद्ध हार्दिक पंड्या मिळणार पाहायला; पहिली लढत सीएसके विरुद्ध गुजरात टायटन्स
author img

By

Published : Mar 31, 2023, 4:33 PM IST

नवी दिल्ली : आयपीएलचा पहिला सामना पाहण्याची क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. महेंद्र सिंह धोनीचे पहिल्या सामन्यात खेळणे निश्चित झाले आहे. धोनीचे चाहते त्याला मैदानावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आज संध्याकाळी गुजरात जायंट्स (GT) विरुद्ध खेळणार आहे. आतापर्यंत मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले होते की, धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असून, त्यामुळे त्याच्या या सामन्यात खेळण्याबाबत शंका निर्माण झाली होती.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी केली पुष्टी : सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या खेळण्याबाबत पुष्टी केली आहे. या माहितीनंतर माही बऱ्याच काळानंतर त्याच्या खऱ्या रंगात दिसणार हे निश्चित आहे. CSK चा कर्णधार नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनेक दिवस घाम गाळत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेट प्रॅक्टिस दरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. धोनीने गुरुवारी सरावही केला नाही. तो मैदानावर लंगडताना दिसला. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता होती. पण, काशी विश्वनाथनने धोनी हा सामना खेळणार असल्याची पुष्टी केली आहे.

IPL 2023  Mahendra Singh Dhoni vs Hardik Pandya
महेंद्र सिंह धोनी विरुद्ध हार्दिक पंड्या पाहायला मिळणार

CSK vs GT हेड टू हेड GT : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील CSK ने गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. 17 एप्रिल 2022 रोजी झालेल्या एका रोमांचक सामन्यात GT ने CSK चा तीन गडी राखून पराभव केला. जीटीने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. 15 मे 2022 रोजी दोघे पुन्हा समोरासमोर आले. टायटन्सने हा सामनाही सात गडी राखून जिंकला. गेल्या मोसमात CSK आपल्या रंगात दिसला नाही.

आयपीएलचा थरार आजपासून : 2023 चा टाटा आयपीएल सीझनचा उद्घाटन सोहळा गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. ३१ मार्च रोजी उद्घाटनाच्या सत्रात अनेक रंगारंग कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ, कॅटरिना कैफ, रश्मिका मंदान्ना आणि गायक अरजित सिंग देखील यावर्षीच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत.आयपीएल 2023 ची सुरुवात शुक्रवारी 31 मार्च रोजी बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या वर्षीचा विजोता संघ गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीने होणार आहे. 31 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सलामीचा सामना होईल. देशात 12 ठिकाणी यंदाचा आयपीएल खेळला जाईल आणि स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादमधील याच ठिकाणी खेळला जाईल.

हेही वाचा : First Match of Tata IPL : संध्याकाळ पासून रंगणार आयपीएलचा थरार ; नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार पहिली लढत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.