ETV Bharat / sports

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सने धोनीचा नेट प्रॅक्टीस व्हिडीओ केला शेअर; चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

महेंद्रसिंह धोनीने आयपीएलसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही त्याचा ट्रेलर पाहू शकता. धोनी नेटमध्ये गोलंदाजांची कशी धुलाई करतोय ते पाहा.

MS Dhoni
चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनीचा नेट प्रॅक्टीस व्हिडीओ केला शेअर
author img

By

Published : Mar 28, 2023, 5:18 PM IST

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलच्या तयारीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आहे. नेटवर माहीने प्रचंड मेहनत घेत गोलंदाजांना जेरीस आणले आहे. प्रॅक्टीसमध्ये गोलंदाजांना उत्तुंग षटकार ठोकत त्याने त्यांचा घाम काढला आहे. यावेळी धोनी चेन्नईला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी मैदानावर कसा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धोनी आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे.

CSK चा व्हिडिओ चांगलाच झाला व्हायरल : CSK चा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा 34 सेकंदाचा व्हिडिओ चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमचा आहे. यामध्ये धोनी नेटवर सराव करताना दिसत आहे. धोनी मैदानावर कशी आक्रमक फलंदाजी करतो हे स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी CSK आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर धोनीनेही आयपीएलसाठी स्वत:ची पूर्ण तयारी सुरू केली आहे.

धोनीच्या व्हिडीओला चाहत्यांचे लाईक्स : या व्हिडिओमध्ये धोनी सीएसकेचा हाफ टी-शर्ट आणि हाफ पेंटमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने हेल्मेट, पॅड आणि थाई पॅड घातले आहेत. धोनी सरावासाठी मैदानात जाताच संपूर्ण स्टेडियममध्ये बसलेले त्याचे चाहते धोनी... थाला... थाला म्हणत घोषणाबाजी करू लागतात. अशा प्रकारे चाहते धोनीला प्रोत्साहन देतात. सोशल मीडियावरही त्याच्या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत असल्याचे दिसते.

धोनी आयपीएलच्या या हंगामात निवृत्तीच्या तयारीत : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा 16 वा सीझन 31 मार्चपासून सुरू होणार आहे. तेव्हा लोकांची नजर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा करिष्माई कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे असणार आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल मानली जाते. धोनीला त्यात चांगली कामगिरी करून ग्रॅण्ड फेअरवेल हवा आहे, अशी अपेक्षा आहे. पहिल्या आयपीएलनंतर आतापर्यंत एकाच संघाचे नेतृत्व करणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्याच्या आयपीएल निवृत्तीची तयारी चेन्नई सुपर किंग्जच्या समितीकडून चेपाॅक स्टेडियमवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

चारवेळा चॅम्पियन सीएसकेचा कर्णधार म्हणून धोनी : आयपीएलमधील त्याच्या 16 वर्षांच्या दीर्घ प्रवासात, धोनीने हे सर्व पाहिले आहे. अनेक विजेतेपदे जिंकणे, त्यादरम्यान दोन वर्षांसाठी बंदी, पुन्हा माघार घेण्यापूर्वी CSK चे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवणे. परंतु, काहीही कायमस्वरूपी टिकत नसल्यामुळे, हा आयपीएल हंगाम चारवेळा चॅम्पियन सीएसकेचा खेळाडू म्हणून शेवटचा असेल. या संदर्भात सीएसके व्यवस्थापन किंवा धोनीकडून कोणतेही अधिकृत विधान आले नसले तरी आयपीएलमधून निवृत्तीची काही स्पष्ट चिन्हे नक्कीच दिसू लागली आहेत.

हेही वाचा : IPL Star Sports Launch Subtitles Feed : स्टार स्पोर्ट्स 'सबटायटल फीड' करणार लाँच, चाहत्यांच्या गरजेनुसार असतील फीचर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.