ETV Bharat / sports

IPL 2023 Captain : आयपीएल 16 मध्ये हे खेळाडू असणार कर्णधार; जाणून घ्या आतापर्यंतचा यशस्वी कॅप्टन कोण

इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होत आहे. लीगमधील पहिला सामना गतविजेता गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे.

IPL 2023 Captain
आयपीएल 16 मध्ये हे खेळाडू असणार कर्णधार
author img

By

Published : Mar 24, 2023, 2:54 PM IST

नवी दिल्ली : आयपीएलच्या साखळी टप्प्यात एकूण 70 सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या मोसमात कर्णधार असलेले अनेक खेळाडू यावेळीही कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहेत. सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला एमएस धोनी या मोसमात पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) नेतृत्व करणार आहे. सीएसकेला चार वेळा विजेतेपद मिळवून देणारा धोनी आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. CSK ने 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून शेवटच्या वेळी विजेतेपद पटकावले होते.

रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार : मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. यावेळीही तो खेळाडूंचे नेतृत्व करणार आहे. आणि हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सचे नेतृत्व करेल. पंड्याचा संघ गुजरात टायटन्सने आयपीएल 15 मध्ये पदार्पण केले. पहिल्याच सत्रात संघ चॅम्पियन ठरला. डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असेल. यावेळी पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन असेल. सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व ईडन मार्कराम करणार आहे.

श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार : फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करेल. गेल्या मोसमात फॅफला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) कर्णधारपद मिळाले. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) नियुक्त कर्णधार असणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या चौथ्या सामन्यातून बाहेर पडला होता. तो आयपीएलमध्ये खेळेल की नाही याबाबत अजूनही शंका आहे.

केएल राहुल करणार लखनो सुपर जायंंट्सचे नेतृत्व : आणि केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स (एलसीजी) चे नेतृत्व करेल. राहुल सध्या फॉर्ममध्ये नाही, त्यामुळे एलसीजीचा मार्ग कठीण होऊ शकतो. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स उपविजेते ठरला होता. यावर्षी विश्वकप असल्याने, यंदाच्या आयपीएलला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा : Hasan Mushrif ED Summoned : आमदार हसन मुश्रीफांची आज होणार पुन्हा चौकशी; ईडीने बजावले समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.