लुजोन - ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सर्व खेळाडू आपल्या देशाचे नेतृत्व करत परेड करत असतात. यात प्रत्येक देशातील एका खेळाडूच्या हातात त्याच्या देशाचा राष्ट्रीय ध्वज असतो. त्याला ध्वजवाहक असे म्हणतात. याची सुरुवात १९२० मध्ये एंटवर्प ऑलिम्पिकपासून करण्यात आली होती. ती परंपरा आजतागत सुरू आहे. मात्र आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये यात बदल करण्यात आला आहे.
जपानच्या टोकियोमध्ये यंदाची ऑलम्पिक स्पर्धा जुलै-ऑगस्ट महिन्यात पार पडणार आहे. यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ध्वजवाहकाबाबत एक मोठा बदल केला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक देशाचे दोन खेळाडू ध्वजवाहक असतील. यात एक महिला तर एक पुरूष खेळाडू असेल.
ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बेंच यांनी ध्वजवाहकाविषयी सांगितलं की, 'ऑलिम्पिकमध्ये स्त्री-पुरुष समानता असल्याचे दाखवून देण्यासाठी आम्ही हा निर्णय आहे.'
उपलब्ध आकडेवारीनुसार, टोकियो ऑलिम्पिकमध्ये ११ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. यात ५१.२ टक्के पुरुष तर ४८.८ टक्के महिला खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, सऊदी अरब हा देश २०१२ च्या लंडन ऑलम्पिक आधी आपल्या संघात महिला खेळाडूंना स्थान देत नव्हता.
हेही वाचा - भारतीय उसेन बोल्ट श्रीनिवासचा रेकॉर्ड मोडीत, निशांत शेट्टीने रचला नवा विक्रम
हेही वाचा - तीन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या जलतरणपटूवर ८ वर्षांची बंदी