ETV Bharat / sports

Murder in Punjab: कबड्डी सामन्यात गोळीबार; आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची सार्वजनिक ठिकाणी हत्या

author img

By

Published : Mar 15, 2022, 11:58 AM IST

पंजाबमधील जालंधरमध्ये ( Jalandhar Punjab ) सोमवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कबड्डी स्पर्धेदरम्यान अज्ञात लोकांनी हा हल्ला केला.

Sandeep Nangal
Sandeep Nangal

जालंधर : आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू ( International Kabaddi Player ) संदीप नांगल अंबिया याची एका सामन्यादरम्यान गोळ्या झाडून हत्या ( Murder of Sandeep Nangal Ambiya ) करण्यात आली. गोळी झाडल्यानंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या कबड्डी स्पर्धेच्या सामन्यादरम्यान अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात कबड्डी संघातील खेळाडू संदीप नांगर अंबिया याला अनेक गोळ्या लागल्या. हे पाहून उपस्थितांमध्ये चेंगराचेंगरी झाली. कोणाला काही समजण्यापूर्वीच गोळीबार करणारे हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी खेळाडूला चारचाकी वाहनातून रुग्णालयात नेले. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने जखमीचा वाटेतच मृत्यू झाला. दुसरीकडे, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. या परिसरातील परिस्थिती चिघळू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित लोकांची विचारपूस केली आणि गोळीबार करणाऱ्या चोरट्यांबाबत शोध घेण्यास सुरुवात केली, असून आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदी करुन हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

याशिवाय मारल्या गेलेल्या खेळाडूचे कोणाशीही व्यवहार किंवा अन्य कारणावरून शत्रुत्व होते का, हेही पोलिस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या मृताच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर पोलिसांनी हत्येशी संबंधित सर्व पैलूंचा तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.