नवी दिल्ली - जगातला सर्वात युवा धावपटू म्हणून ओळख असलेला बुधिया सिंगने नवी दिल्लीतील एडमंट हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा - तब्बल १३ वर्षांनी स्पेनने जिंकली बास्केटबॉल विश्वकरंडक स्पर्धा
या स्पर्धेत बुधिया सिंग सोबत ५ ते १७ वर्षाच्या खेळाडूंनी आणि त्यांच्या पालंकानी भाग घेतला होता. एडमंट एचआर कंसल्टिंगतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची सुरुवात दिल्लीच्या कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजपासून झाली.
तरुणांना अमली पदार्थापासून दूर ठेवण्याचा संदेश देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे, या स्पर्धेचे आयोजक अखिलेश कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, 'या स्पर्धेत से नो टू ड्रग्स अभियान आम्ही चालवले. स्पर्धेत सहभागी झालेल्या लोकांनी व्यसनापासून लांब राहण्याने वचन दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या फिट इंडिया मोहिमेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा यशस्वी झाली.'
ही स्पर्धा पाच प्रकारात विभागली होती. त्यामध्ये छोट्य़ा मुलांसाठी १ किलोमीटर, फन रनसाठी ३, ५, १० आणि २१.१ किलोमीटर असे प्रकार केले होते. मॅरेथॉन विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.