नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसचा परिणाम क्रीडाक्षेत्रावरही झाला असून अनेक क्रीडापटू आपल्या घरीच आहेत. या व्हायरसमुळे भारतातील अनेक खेळाडूंना आर्थिक झळ बसली आहे. दरम्यान एशियन युथ मीटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेराज अलीची व्यथा समोर आली होती. मेराजच्या वडिलांची नोकरी गेली असून त्याला कुटुंबाचा भार उचलावा लागत आहे. आता अजून एक उदयोन्मुख धावपटू आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
धावपटू अली अन्सारीला कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी फळांची विक्री करावी लागत आहे. अली अन्सारीने एशियन युथ गटात कांस्यपदक मिळवले आहे. धावण्यामध्ये त्याचे भवितव्य उज्वल असले तरी, सध्या त्याला फळविक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे.
-
Delhi: Young sportsperson from underprivileged families are finding it hard to continue their sport amid #COVID19. Ali Ansari says, "My family is not financially sound & lockdown made our lives more difficult. Nowadays I help my father at his fruit shop". pic.twitter.com/M5xeaAvkH7
— ANI (@ANI) July 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Young sportsperson from underprivileged families are finding it hard to continue their sport amid #COVID19. Ali Ansari says, "My family is not financially sound & lockdown made our lives more difficult. Nowadays I help my father at his fruit shop". pic.twitter.com/M5xeaAvkH7
— ANI (@ANI) July 21, 2020Delhi: Young sportsperson from underprivileged families are finding it hard to continue their sport amid #COVID19. Ali Ansari says, "My family is not financially sound & lockdown made our lives more difficult. Nowadays I help my father at his fruit shop". pic.twitter.com/M5xeaAvkH7
— ANI (@ANI) July 21, 2020
दिल्लीतील महिपालपूरचा रहिवासी असलेला अली म्हणाला, ''छोट्या कुटुंबातील युवा खेळाडूंना आपला खेळ चालू ठेवणे कठीण झाले आहे. माझ्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लॉकडाऊनमुळे आमचे जीवन अधिक कठीण झाले आहे. आजकाल मी वडिलांच्या दुकानात काम करतो.''
''इथे लोक मला केळीवाला म्हणतात. पण मी काय करू शकतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावे लागेल. मैदानी सरावाला देशात परवानगी देण्यात आली आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत आहे'', असेही तो म्हणाला.