ओमान - भारताचा युवा टेबल टेनिसपटू जीत चंद्राने ओमान ओपनमध्ये २१ वर्षांखालील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. चंद्राने जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या सहकारी मानव ठक्करचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
हेही वाचा - कोरोनाचा राग चीनवर..! भडकलेला शोएब म्हणाला.. तुम्ही वटवाघुळं, कुत्रे कसं खाऊ शकता?
जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानावर असलेल्या चंद्राने अवघ्या २४ मिनिटांत ठक्करला ११-६, ११-७, १३-११ असे पराभूत केले. मानवने सुरावाजुला स्नेहितला तर, चंद्राने मानुष शाहला मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दीया चीताली आणि अर्चना कामत यांनीही महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
दुहेरीत शरथ आणि देसाई यांनी ओमानच्या मुहनाद अल बलुशी आणि असद अलराई यांना तर, शाह आणि ठक्कर यांनी बेलारूसच्या अलियकसंद्र खानिन आणि पावेल प्लाटोनोव्हला अंतिम आठमध्ये पराभूत केले.