ETV Bharat / sports

टोकियो पॅराऑलिम्पियन खेळाडूंचे जंगी स्वागत! - Paralympian

आज अवनी लेखरा आणि बॅडमिंटनपटू सुहास यथिराजसह आणखी काही पॅरा अॅथलिट टोकियोहून मायदेशी परतले. त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

India's history-making Paralympians return to rousing reception
टोकियो पॅराऑलिम्पियन खेळाडूंचे जंगी स्वागत!
author img

By

Published : Sep 6, 2021, 8:50 PM IST

Updated : Sep 6, 2021, 10:49 PM IST

नवी दिल्ली - टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा गाजवल्यानंतर भारतीय पॅरा अॅथलिट मायदेशी परतले. आज अवनी लेखरा आणि बॅडमिंटनपटू सुहास यथिराज भारतात आले. यावेळी त्याचे चाहत्यांसह कुटुंबीयांनी विमानतळावर जोरदार स्वागत केले.

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 19 पदके जिंकली. या कामगिरीसह भारत पदकतालिकेत 24 व्या स्थानावर राहिला. यात पाच सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कास्य पदकाचा समावेश आहे. आज पॅरा अॅथलिटची शेवटची तुकडी भारतात परतली. यात बॅडमिंटनपटू, शुटर तसेच तिरंदाज होते.

हरियाणाचे क्रीडामंत्री आणि माजी हॉकी खेळाडू संदीप सिंह यांच्यासह पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंचे जंगी स्वागत केले.

याआधी रौप्य पदक विजेती टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलसह इतर खेळाडू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. विमानतळ प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेले अॅथलिट गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत.

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे खेळाडू

अवनी लेखरा, प्रमोद भगत, कृष्णा नागर, सुमित अंतिल आणि मनिष नरवाल.

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेते खेळाडू

भाविनाबेन पटेल, सिंघराज अदाना, योगेश कठुनिया, निषाद कुमार, प्रविण कुमार, देवेंद्र झाझरिया, मरियप्पन थंगावेलू आणि सुहास यथिराज.

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये कास्य पदक विजेते खेळाडू -

अवनी लेखरा, हरविंदर सिंग, शरद कुमार, सुंदर सिंग गुर्जर, मनोज सरकार आणि सिंघराज अदाना.

हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, मिसबाह उल हकसह वकार युनूसचा राजीनामा

हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर

Last Updated : Sep 6, 2021, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.