ETV Bharat / sports

शुमाकरच्या पोराला मागे टाकत भारताच्या छाव्याने नोंदवला विक्रम - racing star jehan daruvala news

जेहानने शेवटच्या १५ मिनिटांत चमकदार कामगिरी करुन या ३२ लॅपच्या या शर्यतीत तिसरे स्थान मिळवले. त्याने फिचर शर्यतीत आठव्या स्थानावरून सुरुवात केली.

Indian racing star jehan daruvala wins podium for the first time in F2
शुमाकरच्या पोराला मागे टाकत भारताच्या छाव्याने नोंदवला विक्रम
author img

By

Published : Nov 29, 2020, 10:59 AM IST

बहरीन - भारताचा रेसिंग स्टार जेहान दारुवालाने शनिवारी बहरीन ग्रँड प्रिक्स सपोर्ट रेस येथे एफआयए फॉर्म्युला २मध्ये प्रथमच पोडियम मिळवला. रेड बुल रेसिंग ज्युनियरचा जेहान अशी कामगिरी नोंदवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

Indian racing star jehan daruvala wins podium for the first time in F2
भारताचा रेसिंग स्टार जेहान दारुवाला

हेही वाचा - कुस्तीपटू नरसिंह यादवला कोरोना

जेहानने शेवटच्या १५ मिनिटांत चमकदार कामगिरी करुन या ३२ लॅपच्या या शर्यतीत तिसरे स्थान मिळवले. त्याने फिचर शर्यतीत आठव्या स्थानावरून सुरुवात केली. यानंतर त्याने दोन स्थानांची सुधारणा करत सहावे स्थान गाठले. पाचव्या लॅपमध्ये त्याची दोन स्थानांनी घसरण झाली. वेग कमी झाल्याने तो अजून दोन स्थानांनी मागे राहिला. यानंतर काही लॅप तो १०व्या स्थानी होता.

मिक शुमाकरला टाकले मागे -

२२ वर्षीय जेहानने टायर बदलल्यानंतर १८व्या स्थानापासून सुरुवात केली. १९व्या लॅपमध्ये तो सहाव्या स्थानी होता. जेहानने शर्यतीचा विजेता रॉबर्ट श्वार्ट्झमनला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले. शेवटच्या काही मिनिटांत त्याने आघाडीचा ड्रायव्हर आणि दिग्गज रेसर मायकेल शुमाकरचा मुलगा मिक शुमाकरला मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला. गतवर्षी जेहान एफआयए फॉर्म्युला ३ चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता ठरला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.