ETV Bharat / sports

GT vs CSK IPL 2023 : गुजरात टायटन्सने विजयाने केली सुरुवात, CSK चा 5 गडी राखून पराभव केला - नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे

IPL 2023 चा सलामीचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सने जिंकला आहे. चेन्नईने दिलेले 179 धावांचे लक्ष्य गुजरात टायटन्सने 4 चेंडू बाकी असताना 182 धावा करून पूर्ण केले. गुजरातकडून शुभमन गिलने 36 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या खेळीत शुभमनने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. दुसरीकडे, चेन्नईकडून गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरने सर्वाधिक 3 बळी घेतले.

ipl 2023
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा भव्य उद्घाटन समारंभ
author img

By

Published : Mar 31, 2023, 6:39 PM IST

Updated : Apr 1, 2023, 6:21 AM IST

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग 2023 सुरू झाली असून, सलामीच्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने विजयी सुरुवात करत चेन्नईचा पराभव केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या 16व्या हंगामाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. बॉलीवूड स्टार तमन्ना भाटिया, रश्मिका मानधना आणि अरिजित सिंग उद्घाटन सोहळ्यात आपले सादरीकरण केले. त्याचवेळी आयपीएल 2023 ची सुरुवात 4 वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातचा विजय झाला.

चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी (फलंदाजी) : आयपीएलच्या महासंग्रामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 178 धावांचा डोंगर गुजरात टायटन्ससमोर उभा केला आहे. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करीत 50 चेंडूत 92 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने गुजरातच्या गोलंदाजांना चांगलेच धुऊन काढले. परंतु, अलझारी जोसेफच्या एका फुलटाॅस आलेल्या चेंडूला सीमापार धाडण्याच्या नादात तो शुभमन गीलद्वारे झेलबाद झाला.

चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी : त्यानंतर आलेला मोईन अली 17 चेंडूत 23 धावा करून रशिद खानच्या चेंडूवर सहाद्वारे झेलबाद झाला. बेन स्टोक्स अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. तर अंबाती रायडूचा 12 धावांवर त्रिफळा उडाला. नवख्या शिवम दुबेने चांगली फलंदाजी करीत 18 चेंडूत 19 धावा केल्या. त्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा एक उत्तुंग फटका मारताना 1 धावांवर बाद झाला.

गुजरात टायटन्सची फलंदाजी : गुजरात टायटन्स 179 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. मोठ्या धावसंख्येला चेस करताना संघावर निश्चितच दबाव असतो. सलामीवीर वाॅशिंग्टन साहा आणि शुभमन गिलने गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, वाॅशिंग्टन 25 धावा असताना राजवर्धन हंगेरकरच्या एका चेंडूवर वाॅशिंग्टन शिवम दुबेद्वारा झेलबाद झाला. साई दर्शनने शुभमन गिलला चांगली सुरुवात करून दिली. परंतु राजवर्धनच्या एका चेंडूवर तो धोनीद्वारे झेलबाद झाला, त्यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पंड्या रवींद्र जडेजाच्या चेंडूवर 8 धावांवर त्रिफळाचित होऊन तंबूत परतला.

गुजरात टायटन्सची गोलंदाजी : आज गुजरात टायटन्सचे गोलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. मोहम्मद शमीने त्याच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 2 विकेट घेतल्या. त्यानंतर हार्दिक पंड्यासुद्धा आज विशेष कामगिरी करू शकला नाही. अलजेरी जोसेफने 4 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या. यश दयालच्या शेवटच्या ओव्हरमध्ये सीएसकेने 14 धावा ठोकल्या.

या दिग्गज कलाकारांनी दाखवली झलक : या आयपीएल हंगामाला सुरुवात झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक अरजित सिंहने या कार्यक्रमाची शोभा वाढवत, आयपीएलसाठी गाणी गायली. तसेच, हिंदी चित्रपटसृष्टीची नायिका तमन्ना भाटियाने या कार्यक्रमात सुंदर डान्स करून मोठा तडका टाकला.

रश्मिका मंधानाचा जबरदस्त परफाॅर्मन्स : त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री मंधाना हिने तिच्या पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर सुंदर परफाॅर्मन्स करीत शानदार डान्स केला. नरेंद्र मोदी स्टेडियम प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. त्याचबरोबर रश्मिका मंधाना हिने जबरदस्त डान्स प्रेक्षकांना तिच्या गाण्यावर थिरकायला लावले.

हेही वाचा : IPL 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे इंडियन प्रीमियर लीग 2023 चा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा सुरू

Last Updated : Apr 1, 2023, 6:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.