नवी दिल्ली - भारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंगने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान शिवपालने ८५.४७ मीटर लांब भाला फेकत ही पात्रता मिळवली.
-
Good news from track and field as #ShivpalSingh qualifies for #Tokyo2020 in men’s javelin throw after an effort of 85.47m at the ACNW League Meeting in South Africa. Qualification mark was 85m. Congratulations Shival! pic.twitter.com/vIcuGUbyNg
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Good news from track and field as #ShivpalSingh qualifies for #Tokyo2020 in men’s javelin throw after an effort of 85.47m at the ACNW League Meeting in South Africa. Qualification mark was 85m. Congratulations Shival! pic.twitter.com/vIcuGUbyNg
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 10, 2020Good news from track and field as #ShivpalSingh qualifies for #Tokyo2020 in men’s javelin throw after an effort of 85.47m at the ACNW League Meeting in South Africa. Qualification mark was 85m. Congratulations Shival! pic.twitter.com/vIcuGUbyNg
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 10, 2020
हेही वाचा - मोहन बागानने जिंकले आय-लीगचे जेतेपद
ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी ठरवलेला ८५ मीटरचा निकष शिवपालने साध्य केला आहे. शिवपालची ही पहिलीच ऑलिम्पिकवारी असून याआधी भारताच्या नीरज चोप्रानेही भालाफेकमध्ये ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले आहे.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रासमवेत शिवपाल आता भारताचे प्रतिनिधित्व करेल. या वर्षाच्या सुरूवातीस दुखापतीतून परतल्यानंतर भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने ८७.८६ मीटर लांब भाला फेकत ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.