ETV Bharat / sports

Asian Champions Trophy: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ, जय शाह यांनी केले अभिनंदन - भारतीय हॉकी संघाचा कर्णधार

भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2003 मध्ये पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. तर पाकिस्तानी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर गेला आहे.

भारतीय हॉकी संघाकडून पाकिस्तानचा पराभव
भारतीय हॉकी संघाकडून पाकिस्तानचा पराभव
author img

By

Published : Aug 10, 2023, 8:09 AM IST

नवी दिल्ली: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय हॉकी संघाच्या या विजयावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे. जय शाह यांनी ट्विट करत भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले. भारतीय संघाने एक उल्लेखनीय विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

भारताचा विजय: चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानच्या संघात हॉकीचा सामना झाला. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगने केले. भारतीय संघाने सामन्याची सुरुवातीपासून पाकिस्तानच्या संघावर दबाव ठेवला होता. भारताकडून हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले तर जुगराज सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताने 4-0 असा पाकिस्तानचा पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांतून 13 गुणांसह आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्याबद्दल @TheHockeyIndia चे अभिनंदन! निष्ठा आणि कौशल्य खरोखर प्रेरणादायी होते. 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी संघाला हार्दिक शुभेच्छा. विजय मिळवूया.

  • Congratulations @TheHockeyIndia on a fabulous win against Pakistan in the Asian Champions Trophy, and qualifying for the semi-finals! The dedication and skill were truly inspiring. Best wishes to the team for the semi-final clash on 11th August. Let's bring home that victory! 🇮🇳… pic.twitter.com/5tpAowGcgh

    — Jay Shah (@JayShah) August 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर: भारताने या विजयासह आशियाई चॅम्पियन ट्रॉफीची उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर तीन वेळा आशियाई चॅम्पियन ट्रॉफी मिळवलेल्या पाकिस्तान संघाचा या स्पर्धेतील प्रवास संपला. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गोलने पराभव टाळणे आवश्यक होते. उपांत्य फेरीत आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला पराभव टाळणे किंवा सामना ड्रा करणे आवश्यक होते. दरम्यान पाकिस्तान संघ फक्त तीन मिनीटे भारतीय संघाला जबरदस्त टक्कर देऊ शकला. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघावर दबाव टाकला. खेळाच्या शेवटपर्यंत भारताने त्यांचावरील दबाव कायम ठेवला.

  • #WATCH | "The overall performance of the team was very good. The crowd also supported us a lot. We are going to prepare for the Asian Games in a full-swing," says Indian hockey player, Manpreet Singh as India beat Pakistan 4-0 in Asian Champions Trophy. pic.twitter.com/MhLRFCOHjC

    — ANI (@ANI) August 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संधीचे केले सोने: काहीशी गडबडीनंतर पाकिस्तानचा खेळाडू अकील अहमदने अब्दुल हन्नन याच्याकडे चेंडू सुंदरपणे पास केला. परंतु कृष्णन बहादुर पाठक याने हन्ननचा फटका शानदार पद्धतीने वाचवला. पाठकने हन्ननला रिबाउंडमध्येच थांबवले. परंतु रिव्ह्यू घेतल्यानंतर पाकिस्तानला पेनल्ट्री कॉर्नर करण्याची संधी मिळाली. यामुळे पाकिस्तान संघाला स्कोअर करण्याची संधी मिळाली होती. परंतु पाठकने पाकिस्तानचा पेनल्ट्री कॉर्नर व्यवस्थितपणे अडवला. त्याचजागी भारतीय संघाला जेव्हा पेनल्ट्री कॉर्नर मिळाला त्यावेळी त्यांनी संधीचे सोने करत गोल केले.

तणाव फ्री खेळ: अर्ध्या वेळेची शिट्टी होण्याआधी भारतीय संघाकडे दोन गोलची आघाडी होती. या दोन गोलच्या आघाडीमुळे भारतीय हॉकी संघ खेळात तणावमुक्त खेळ खेळत होता. या सामन्यात भारतीय संघाला एकामागून एक पेनल्ट्री कॉर्नर मिळाले. या सामन्यादरम्यान हरमनप्रीतचा दुसरा गोल खूप अप्रतिम होता. हरमनप्रीतने हुसेनच्या पायांवरुन ड्रॅग फ्लिक करत दुसरा गोल केला. पाकिस्तानी संघ गोल करण्याचा प्रयत्न करत होता परंतु भारतीय खेळाडूंनी त्यांना गोल करू दिला नाही.

हेही वाचा-

  1. World Archery Championships : शाळा-कॉलेजच्या वयात सातारची आदिती स्वामी तिरंदाजीत बनली वर्ल्ड चॅम्पियन, जाणून घ्या तिचा सुवर्णमय प्रवास...
  2. Sania Mirza And Shoaib Malik divorce : शोएब आणि सानिया पुन्हा एकदा चर्चेत; घटस्फोटाच्या बातम्यांनी पकडला जोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.