नवी दिल्ली - भारताची अग्रणी महिला नेमबाज अपूर्वी चंदेलाला कोरोनाची लागण झाली आहे. अपूर्वीने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. ती ऑलिम्पिकच्या सरावासाठी पुढील तीन महिने क्रोएशिया येथे जाणार होती. पण त्याआधीच तिला कोरोनाची लागण झाली आहे.
अपूर्वीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारातून कोटा मिळवला आहे. ती या प्रकारात भारताचे नेतृत्व करणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय नेमबाजांचे ट्रेनिंग शिबीर क्रोएशियातील जगरेब येथे आयोजित करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबीर ३ महिन्यापर्यंत चालणार आहे. यामुळे अनेक प्रशिक्षक आणि भारतीय नेमबाज या शिबीरात सहभागी होण्यास इच्छुक नाहीत.
संपूर्ण देश कोरोना महामारीने त्रस्त आहे. अशा कठीण स्थितीत नेमबाज आणि प्रशिक्षक आपल्या कुटुंबियांशिवाय राहु शकत नाहीत. जर खेळाडूंच्या परिवारातील सदस्य आजारी झाला तर त्याचे काय होणार?, खेळाडू आपल्या परिवाराची मदतीसाठी परत कसे येऊ शकतील?, अशा कठीण काळात खेळाडू क्रोएशियामध्ये कसे काय प्रशिक्षण घेऊ शकतील?, असा संतत्प सवाल एआरएआयच्या एका अधिकाऱ्याने विचारला आहे. दुसरीकडे एनआरएआयच्या वरिष्ठ आधिकाऱ्याने हे शिबीर नियोजित वेळेनुसारच होईल, असे सांगितलं आहे.
हेही वाचा - भारतीय तलवारबाजी संघाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यात अपयश
हेही वाचा - मेरी कोमसह ९ महिला बॉक्सिंगपटू ट्रेनिंगसाठी येणार पुण्यात