ETV Bharat / sports

IND vs SA 1st T20 : टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेला 212 धावांचे लक्ष्य; इशान किशनचे शानदार अर्धशतक - Sports News

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 211 धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेला आता 212 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

IND vs SA
IND vs SA
author img

By

Published : Jun 9, 2022, 9:30 PM IST

नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ( IND vs SA 1st T20 ) आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून इशान किशनने शानदार खेळी केली. त्याने 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार ऋषभ पंतने 29 धावांची तुफानी खेळी केली. हार्दिक पांड्या 31 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल आणि प्रिटोरियस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियासाठी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामीला आले. यादरम्यान किशन 48 चेंडूत 76 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर ऋतुराज 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 3 षटकार मारले. श्रेयस अय्यर 36 धावा करून बाद झाला. त्याने 27 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

शेवटी हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी चांगली खेळी केली. पंत 16 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर पांड्याने 12 चेंडूंत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. दिनेश कार्तिक केवळ दोन चेंडू खेळू शकला. तो एका धावेवर नाबाद राहिला. अशा प्रकारे भारताने 20 षटकात 4 विकेट गमावून 211 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्टजेने 4 षटकांत 36 धावा देत 1 बळी घेतला. केशव महाराजने 3 षटकात 43 धावा देत 1 बळी घेतला. वेन पारनेलने 4 षटकांत 32 धावा देत 1 बळी घेतला. ड्वेन प्रिटोरियसनेही एक विकेट घेतली. त्याने 3 षटकात 35 धावा दिल्या.

हेही वाचा - Indian women team in Sri Lanka tour : श्रीलंका दौऱ्यावर हरमनप्रीत कौर करणार भारतीय संघाचे नेतृत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.