मेलबर्न: भारत पाकिस्तान सामन्याची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसे- तसे सामने आणि खेळाडूंच्या कामगिरीविषयी चर्चेचा बाजार चांगलाच तापत आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांचा हाय व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे.
मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा विक्रम मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही टी-२० सामना खेळला नसला, तरी एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाला या मैदानावर धूळ चारली आहे. तसे पाहिले तर या मैदानावर टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा विजयाचा विक्रम 100 टक्के आहे. या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामने झाले आहेत. आणि दोन्हीमध्ये भारताने विजय मिळवून पाकिस्तान धूळ चारली आहे. हे दोन्ही सामने 1985 मध्ये क्रिकेटच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यान खेळले गेले होते. या दरम्यान भारताने पहिल्या सामन्यात 6 विकेट्सनी पराभूत केले होते, तर अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव करत 100 टक्के विजयाचा विक्रम कायम ठेवला होता.

मेलबर्नमध्ये T20 विक्रम मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताने आतापर्यंत एकूण 4 टी-20 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे खेळल्या गेलेल्या चारही T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा विजयाचा विक्रम चांगलाच आहे. टीम इंडियाने येथे झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याचवेळी संघाला एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, तर एक सामना अनिर्णयीत राहिला.
मेलबर्नमध्ये कोहली आणि रोहितचा विक्रम मेलबर्न येथे सामने खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंचे रेकॉर्ड पाहिल्यास लक्षात येईल की, मेलबर्नमध्ये झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीने 3 सामन्यात 1 अर्धशतकाच्या मदतीने 90 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माने 4 सामन्यांत 68 धावा केल्या आहेत. या मैदानावर खेळलेल्या दिनेश कार्तिकने 2 सामन्यांत केवळ 8 धावा केल्या आहेत. याशिवाय टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूने एकही टी-20 सामना खेळलेला नाही. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी येथे 2 सामन्यांत प्रत्येकी 3 बळी घेतले असले, तरी हे दोन्ही गोलंदाज दुखापतीमुळे या विश्वचषकात टीम इंडियासोबत नाहीत.

या मैदानावर दुसरा सामना टीम इंडियाचा दुसरा सामना सिडनीच्या या मैदानावर ६ नोव्हेंबरला बी ग्रुपमधील क्वालिफायर 1 सह खेळवला जाणार आहे. शिवाय अंतिम सामनाही या मैदानावर होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाची क्षमता सुमारे 1 लाख प्रेक्षकांची आहे. त्यामुळे येथे भारत आणि पाकिस्तानची हाय व्होल्टेज स्पर्धा ठेवण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात हे स्टेडियम खचाखच भरले जाणार आहे. कारण सर्व तिकिटे विकली गेली आहेत. T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत प्रथमच ऑस्ट्रेलियानंतर इतर कोणत्याही संघाविरुद्ध येथे जोरदार प्रयत्न करणार आहेत. गेल्या वेळेस पाकिस्तानकडून या ठिकाणी झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ हतबल राहणार आहे.