नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू अॅलन डोनाल्ड हा त्याच्या खेळण्याच्या ( Rahul Dravid Interview ) दिवसांमध्ये सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक ( Most Dangerous Fast Bowlers Allan Donald ) होता. त्याची दोन कारणे होती. पहिले, त्याचा धोकादायक वेग आणि दुसरे म्हणजे, तो काही वेळा फलंदाजांना तोंडी उत्तरे देत असे. 1997 मध्ये, डर्बनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामना ( South African Team was Playing Durban ODI in 1997 ) झाला होता, ज्यामध्ये डोनाल्डने भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची थट्टा केली होती.
-
From reminiscing memories of his playing days in Bangladesh to praising the preparation levels of @imVkohli and on the evolving nature of Test cricket 👍
— BCCI (@BCCI) December 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A special conversation featuring #TeamIndia Head Coach Rahul Dravid 👌
Full interview 🔽 #BANvINDhttps://t.co/nLIvUKc2BC pic.twitter.com/vz5yQhuAsB
">From reminiscing memories of his playing days in Bangladesh to praising the preparation levels of @imVkohli and on the evolving nature of Test cricket 👍
— BCCI (@BCCI) December 15, 2022
A special conversation featuring #TeamIndia Head Coach Rahul Dravid 👌
Full interview 🔽 #BANvINDhttps://t.co/nLIvUKc2BC pic.twitter.com/vz5yQhuAsBFrom reminiscing memories of his playing days in Bangladesh to praising the preparation levels of @imVkohli and on the evolving nature of Test cricket 👍
— BCCI (@BCCI) December 15, 2022
A special conversation featuring #TeamIndia Head Coach Rahul Dravid 👌
Full interview 🔽 #BANvINDhttps://t.co/nLIvUKc2BC pic.twitter.com/vz5yQhuAsB
डोनाल्ड यांनी द्रविडची जाहीर माफी मागितली : आता 25 वर्षांनंतर, सध्या बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या डोनाल्ड यांनी द्रविडची जाहीर माफी मागितली आहे. त्याला डिनरसाठी आमंत्रित केले आहे. डोनाल्ड आणि द्रविड दोघेही सध्या अनुक्रमे बांगलादेश आणि भारताचे प्रशिक्षक म्हणून चितगावमध्ये आहेत. दोन्ही देश कसोटी मालिका खेळत आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड म्हणाले की, डरबनमधील त्या एकदिवसीय सामन्यात द्रविडची स्लेजिंग करताना मी मर्यादा ओलांडली होती.
द्रविडला डोनाल्डचा माफीनामा संदेश दाखवण्यात आला : द्रविडला त्याच वाहिनीवर एका वेगळ्या मुलाखतीत डोनाल्डचा माफीनामा संदेश दाखवण्यात आला. त्याला डोनाल्डच्या आमंत्रणाला प्रतिसाद देण्यास सांगण्यात आले आणि महान भारतीय क्रिकेटपटूने उत्तम प्रतिसाद दिला. द्रविड हसला आणि म्हणाला, अर्थातच मी त्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर या मुलाखतीत द्रविडने टीम इंडियाबद्दलही बरेच काही सांगितले आहे.