चेन्नई - विश्वनाथन आनंद यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने बुधवारी फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पहिल्या दिवशी शानदार सुरुवात केली. भारताने इजिप्त आणि स्वीडनचा पराभव केला. तर फ्रान्ससोबत बरोबरी साधली.
भारताने ग्रुप बी मध्ये इजिप्तचा 6-0 ने दारूण पराभव करत स्पर्धेतील अभियानाला सुरूवात केली. यानंतर फ्रान्ससोबत भारताला कडवी झुंज द्यावी लागली. अखेरीस उभय संघातील सामा 3-3 अशा बरोबरीत राहिला. यानंतरच्या स्वीडनविरूद्धचा सामना भारताने 4-2 अशा फरकाने जिंकला.
तीन फेरीनंतर हंगेरी आपले सर्व सामने जिंकत 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. यानंतर भारतीय संघ पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत फ्रान्स तिसऱ्या स्थानी आहे. त्यांचे 4 गुण आहेत.
दरम्यान, या स्पर्धेत विजयी संघाला दोन गुण मिळतात. तर सामना बरोबरीत राहिला तर दोन्ही संघाला विभागून प्रत्येकी 1-1 गुण दिले जातात. ग्रुपमध्ये अव्वल राहणारे पहिले दोन संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरतील.
भारतीय संघ मागील वर्षी ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या संयुक्त विजेता आहे. भारत रूससोबत संयुक्त विजेता ठरला होता.
हेही वाचा - Video : टीम इंडियाच्या ओवल कसोटीतील ऐतिहासिक विजयावर मोहम्मद कैफचा 'नागिन डान्स'
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीकडे मोठी जबाबदारी, BCCI ची घोषणा