पोखरा (नेपाळ) - येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने एकूण ५६ पदके जिंकली आणि या अभियानाचा शेवट गोड केला. भारताच्या नावावर आता १२४ पदकांची नोंद झाली असून त्यामध्ये ६२ सुवर्ण, ४१ रौप्य आणि २१ कांस्यपदकांचा समावेश आहे. चौथ्या दिवशी वुशु खेळाडू आणि जलतरणपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने आत्तापर्यंतच्या कामगिरीत सुधारणा करत या स्पर्धेत अव्वल स्थान राखले आहे.
हेही वाचा - IND vs WI : क्रिकेट नियमात मोठा बदल, भारत-विडींज टी-२० सामन्यात होणार याची 'ट्रायल'
नेपाळने ३६ सुवर्ण, २७ रौप्य व ३८ कांस्यपदके जिंकली असून ते १०१ पदकांसह दुसर्या स्थानावर आहेत. तर, श्रीलंका (१७ सुवर्ण, ३५ रौप्य व ५५ कांस्यपदकांसह) तिसर्या स्थानावर आहे. गुरुवारी भारताने ३० सुवर्ण, १८ रौप्य व ८ कांस्यपदके जिंकली होती. स्विमींग, वुशु, वेटलिफ्टिंग आणि अॅथलेटिक्समध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकली आहेत. वुशूमध्ये भारताने सात सुवर्णपदके पटकावली आहेत.
वुशुमध्ये भारताचा दबदबा -
पुरुष वुशु अष्टपैलू स्पर्धेत सूरज सिंगने पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ वाई सँथोई देवी (महिला ५२ किलो), पूनम (महिला ७५ किलो), दीपिका (महिला ७० किलो), सुशीला (महिला ६५ किलो), रोशिबिना देवी (महिला ६० किलो) आणि सुनील सिंग ( पुरूष ५२ किलो) यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. विद्यापति चानूने महिलांच्या ५६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.