मस्कट : भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Women's Hockey Team) एफआयएच प्रो लीगमध्ये (FIH Pro League) आपल्या दमदार कामगिरीत सातत्य ठेवले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने चीनला 2-1 अशा फरकाने पराभूत केले. त्याचबरोबर गुणतालिकेत या विजयासह अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. सोमवारी प्रो लीगच्या पहिल्या सामन्यात चीनला 7-1 फरकाने पराभव केल्यानंतर, मंगळवारी भारताने याच संघाला सुल्तान काबूस या ठिकाणी 2-1 ने पराभूत केले.
भारतीय संघाने सोमवारी झालेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात जास्त गोल केले नाहीत, परंतु त्यांनी दाखवून दिले की, धैर्य न गमावता आक्रमक खेळण्यासाठी सक्षम आहेत. अनुभवाच्या कमतरतेचा फटका चीनच्या संघाला (Lack of experience hits China Team) सहन करावा लागला. याशिवाय पूर्वार्धात चीनच्या संघाला चेंडू फार काळ आपल्या ताब्यात ठेवता आला नाही, त्यांच्याकडे अचूकता नव्हती आणि बचावही कमकुवत दिसत होता.
-
Just another day and we see a great performance put up by #TeamInBlue 💙
— Hockey India (@TheHockeyIndia) February 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
One more win against the Chinese at the FIH Hockey Pro League 2021/22 (Women).💪
🇨🇳 1:2 🇮🇳#IndiaKaGame pic.twitter.com/agtq2u8kD5
">Just another day and we see a great performance put up by #TeamInBlue 💙
— Hockey India (@TheHockeyIndia) February 1, 2022
One more win against the Chinese at the FIH Hockey Pro League 2021/22 (Women).💪
🇨🇳 1:2 🇮🇳#IndiaKaGame pic.twitter.com/agtq2u8kD5Just another day and we see a great performance put up by #TeamInBlue 💙
— Hockey India (@TheHockeyIndia) February 1, 2022
One more win against the Chinese at the FIH Hockey Pro League 2021/22 (Women).💪
🇨🇳 1:2 🇮🇳#IndiaKaGame pic.twitter.com/agtq2u8kD5
दुसरीकडे, भारताने सामन्याची जलद सुरुवात करत आक्रमक खेळ दाखवला. भारतीय संघाने चीनच्या बचावफळीवर दडपण आणले, त्याचा फायदा तिसर्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या रूपाने संघाला झाला. गुरजित कौरने (Hockey player Gurjit Kaur) त्याचे गोलमध्ये रूपांतर करत भारताला आघाडी मिळवून दिली. चीनचा संघ वर्षाच्या पहिल्या क्वॉर्टरसाठी भाग्यवान आहे. भारताने अनेक संधी निर्माण केल्या, पण एकतर त्यांचे खेळाडू गोलपासून दूर राहिले किंवा ते चीनचा गोलरक्षक वू सुरोंगला मागे टाकण्यात अपयशी ठरले. उत्तरार्धात चीनने पुनरागमन करत बचावात चांगला खेळ केला. चीनचे आक्रमण थोपवणे भारताला कठीण जात होते.
भारतीय बचावफळीच्या चुकीचा फायदा घेत वांग शुमिनने गोलरक्षक सविताला मागे टाकत चीनला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर भारताला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर करण्यात संघाला अपयश आले. भारताने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये आक्रमण तीव्र केले. मोनिकाने हल्ल्याची जबाबदारी घेतली. भारताला लगेचच पेनल्टी कॉर्नरच्या रूपाने फायदा मिळाला, पण दीप ग्रेस एक्काला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.
-
AT THE 🔝! 🤩
— Hockey India (@TheHockeyIndia) February 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2️⃣ games and wins in both clashes mean that 🇮🇳 are right at the top of the ladder! 💙#IndiaKaGame pic.twitter.com/aifGAPrYrB
">AT THE 🔝! 🤩
— Hockey India (@TheHockeyIndia) February 1, 2022
2️⃣ games and wins in both clashes mean that 🇮🇳 are right at the top of the ladder! 💙#IndiaKaGame pic.twitter.com/aifGAPrYrBAT THE 🔝! 🤩
— Hockey India (@TheHockeyIndia) February 1, 2022
2️⃣ games and wins in both clashes mean that 🇮🇳 are right at the top of the ladder! 💙#IndiaKaGame pic.twitter.com/aifGAPrYrB
गुरजीतने मात्र एक आणि पेनल्टी कॉर्नरवर चीनच्या गोलकीपर वु सुरोंगला पछाडत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. जो निर्णायाक स्कोर ठरला. परंतु भारताचे मुख्य कोच यानेक शोपमॅन (India's head coach Yanek Shopman) नाराज असतील, कारण 33 वेळा चीनच्या सर्कलमध्ये प्रवेस करून ही फक्त सहा गोल शॉट लगावाता आले. मोनिकाला शानदार कामगिरीसाठी सामन्यातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले. ती म्हणाली, चीन विरुद्धच्या दोन सामन्यातील आमच्या कामगिरीने मी खुप आनंदी आहे. गेल्या ऑलिम्पिकप्रमाणे एक युनिट म्हणून खेळणे खूप छान होते. आम्ही पूर्ण स्वातंत्र्याने खेळत आहोत आणि त्याचा पुरेपूर आनंद घेत आहोत.