धर्मशाला - भारत आणि श्रीलंका (INd vs SL) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma)नेतृत्वाखालील भारतीय संघानेही तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 5 गडी गमावून 183 धावा केल्या. पथुम निसांकाने 53 चेंडूत 75 धावा केल्या. (India’s seven-wicket win over Sri Lanka,)
याशिवाय कर्णधार दासून शनाकाने 19 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि पाच षटकार मारले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. श्रीलंकेने शेवटच्या पाच षटकात 80 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात भारताने 17.1 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. श्रेयस अय्यरने 44 चेंडूत 74 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. या खेळीसाठी श्रेयसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. याशिवाय रवींद्र जडेजाने 18 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी संजू सॅमसनने 25 चेंडूत 39 धावा केल्या. त्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कर्णधार रोहित शर्माला दोन चेंडूत एक धाव तर इशान किशनला 15 चेंडूत 16 धावा करता आल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमारने दोन आणि दुष्मंथा चमीराने एक विकेट घेतली.
रोहित हा घरच्या मैदानावर सर्वाधिक टी-२० विजय मिळवणारा कर्णधार
रोहित शर्मा घरच्या मैदानावर सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या इऑन मॉर्गन आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला मागे टाकले आहे. रोहितने 2017 मध्ये पहिल्यांदा संघाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर 17 सामने खेळले आहेत. यातील संघाने 16 सामने जिंकले, तर एकात पराभवाचा सामना करावा लागला. त्याच वेळी, मॉर्गन आणि विल्यमसन या दोघांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघाने घरच्या मैदानावर 15-15 सामने जिंकले आहेत. भारताकडून रोहितनंतर विराट कोहलीचे नाव येते. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर 23 टी-20 सामने खेळले. त्यापैकी 13 जिंकले तर नऊ पराभूत झाले. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
अफगाणिस्तानने सलग 12 टी-20 सामने जिंकले
भारताने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सलग 11 वा विजय नोंदवला आहे. आता भारत विश्वविक्रमाशी बरोबरी करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. अफगाणिस्तानने सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली ही सलग तिसरी T20I मालिका आणि एकूण चौथा मालिका विजय आहे. यादरम्यान, त्याने गेल्या वर्षी टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला, या वर्षी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत 3-0 ने मात केली आणि आता श्रीलंकेवर 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने T20 वर्ल्डमध्ये आयर्लंड, नामिबिया आणि अफगाणिस्तानलाही पराभूत केले होते. भारताने घरच्या भूमीवर टी-20 प्रकारात सलग सातवी मालिका जिंकली आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray : मराठीचा द्वेष बरा नव्हे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष वाभाडे काढले