सेंट जाॅर्ज पार्क/दक्षिण अफ्रिका : भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारून डावाला सुरुवात केली. टीम इंडियाकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, संघाच्या 62 धावसंख्येवर शेफाली डेलानीच्या चेंडूवर झेलबाद झाली. भारताला हा पहिला धक्का होता.
स्मृती मंधानाची दमदार फलंदाजी : सलामीला आलेल्या स्मृती मंधानाने जबरदस्त खेळी करीत अवघ्या 56 चेंडूत 87 धावा केल्या. तिच्या तडाखेबंद खेळी आयर्लंडचा संघ हैराण झाला आहे. तिने मैदानावर चौफेर टोलेबाजी करीत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकत तिने 87 धावांची दमदार खेळी केली.
भारतीय संघाची फलंदाजी : टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना, 19 षटकांत 143 धावा केल्या. भारताकडून शेफाली वर्माने 29 चेंडूत 24 धावा, स्मृती मानधनाने 56 चेंडूत 87 धावांची मोठी खेळी करीत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. त्यानंतर आलेल्या हरमनप्रीत कौरने 20 चेंडूत 13 धावा केल्या. रिचा घोष आज खाते उघडू शकली नाही, ती शून्यावर तंबूत परतली. दीप्ती शर्मासुद्धा भोपळ्यावर पॅव्हेलिनमध्ये परतली.
आयर्लंडची गोलंदाजी : आयर्लंड संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केल्यानंतर आयर्लंडच्या संघाने भारतीय संघाला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भारताकडून स्मृती मंधानामुळे आयर्लंडची रणनीती कमजोर पडत होती. स्मृती मंधाना व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. आयर्लंडकडून लुरा डेलनीने भेदक गोलंदाजी करीत 3 विकेट घेतल्या. तर ओर्ला प्रेंडरगास्टने स्मृती मंधानाला तंबूत पाठवून महत्त्वाची विकेट घेतली. तिने एकूण 2 विकेट घेतल्या. तर एरिएन केलीने 1 विकेट घेतली