दुबई: भारताने बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. रोहित शर्मा आयसीसी कसोटी क्रमवारीत 9व्या स्थानावर पोहोचला आहे. (ICC Test Rankings Rohit Sharma) बांगलादेशविरुद्धच्या चितगावमधील पहिल्या कसोटीत 90 आणि नाबाद 102 धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजारालाही त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. त्याने 19 स्थानांची झेप घेतली, त्यामुळे तो आता 16व्या स्थानावर पोहोचला आहे.
पुजारा व्यतिरिक्त शुभमन गिललाही फायदा झाला असून, तो 56व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय श्रेयस अय्यरही २६व्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर कागिसो रबाडाने पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. तो 4 स्थानांची झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रबाडाच्या उसळीमुळे जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन अनुक्रमे 4 आणि 5 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
भारताच्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या डावखुऱ्या फिरकीपटू जोडीनेही चांगली उसळी घेतली आहे. अक्षरने 10 स्थानांची झेप घेत अव्वल 20 मध्ये प्रवेश केला आहे, तो 18 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर कुलदीप यादवने 19 स्थानांची झेप घेत 49 वे स्थान मिळविले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने गाबा येथे प्रत्येक डावात ४ विकेट घेत चार स्थानांनी झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन फलंदाजांच्या यादीत वर पोहोचले आहेत. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने पाकिस्तानमधील तिन्ही कसोटीत शतके झळकावल्यानंतर प्रथमच अव्वल 50 मध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 130 रेटिंगसह पहिल्या आणि भारत 114 रेटिंगसह दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका 104 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.