ETV Bharat / sports

मला विश्वास आहे पॅरा अॅथलिट टोकियोत चांगलं प्रदर्शन करतील - अनुराग ठाकूर

टोकियो पॅरा ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंसाठी भारताच्या पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने निरोप कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमात व्हर्चुअल पद्धतीने उपस्थित राहत खेळाडूंचे मनोबल वाढवले.

I have full confidence that para-athletes will perform well in the Tokyo Games: Anurag Thakur
मला विश्वास आहे पॅरा अॅथलिट टोकियोत चांगलं प्रदर्शन करतील - अनुराग ठाकूर
author img

By

Published : Aug 12, 2021, 8:02 PM IST

Updated : Aug 12, 2021, 8:18 PM IST

नवी दिल्ली - टोकियो पॅरा ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंसाठी भारताच्या पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने निरोप कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमात व्हर्चुअल पद्धतीने उपस्थित राहत खेळाडूंचे मनोबल वाढवले. या कार्यक्रमाला जी. किशन रेड्डी, मिनाश्री लेखी, खासदार कृष्ण कपूर, पीसीआयचे सचिव गुरूशरण सिंह, पीसीआय अध्यक्षांसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अनुराग ठाकूर या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मला विश्वास आहे की, पॅरा अॅथलिट टोकियोत चांगले प्रदर्शन करतील. देशाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मला कल्पना आहे की, तुम्ही तुमच्या कामगिरीच्या जोरावर देशाचे झेंडा उंचीवर घेऊन जालं.

सद्याची परिस्थिती पॅरा अॅथलिटसाठी कठीण आहे. परंतु तुमचे पॅशन तुम्हाला खेळात विजयी करण्यास मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्याशी बोलतील आणि पॅरालिम्पिकनंतर ते अॅथलिटना भेटणार देखील आहेत. मोदींनी नेहमी खेळाडूंचे मनोबल वाढवलं आहे. तुम्ही जावा आणि कोणतही दडपण न घेता चांगली कामगिरी करत पदकं जिंका, असे देखील ठाकूर म्हणाले.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकला जाणारे अॅथलिट या कार्यक्रमात व्हर्चुअल पद्धतीने सहभागी झाले होते. खेळाडू सद्या बायो बबलमध्ये आहेत. त्यामुळे ते अशा कार्यक्रमात स्पर्धा संपेपर्यंत सहभागी होऊ शकत नाहीत.

रिओ ऑलिम्पिक 2016 मधील रौप्य पदक विजेत्या आणि पीसीआयच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी सांगितलं की, टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये आपल्याला मोठा स्पर्धक मानलं जात आहे. खेळाडू त्याच्या संपूर्ण लयीत आहेत.

यंदा भारताचे 54 पॅरा अॅथिलिट या स्पर्धेत भाग घेणार आहेत. हा आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. दरम्यान ही स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान सुरू होणार आहे. भारताचे अभियान या स्पर्धेत 27 ऑगस्ट पासून सुरूवात होईल. या दिवशी पुरूष आणि महिला तिरंदाजांचे इव्हेंट होणार आहेत.

हेही वाचा - INTERVIEW: कास्य पदकावर समाधानी नाही लवलिना बोर्गोहेन, म्हणाली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून स्वप्न पूर्ण करेन

हेही वाचा - कास्य पदक जिंकणाऱ्या मनप्रीत सिंगने आईच्या कुशीत घेतला विसावा, फोटो होतोय व्हायरल

Last Updated : Aug 12, 2021, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.