ETV Bharat / sports

Hockey World Cup : हॉकी विश्वचषकचे उद्घाटन, रणवीर सिंह, दिशा पाटनी यांच्या सादरीकरणाकडे सर्वांचे लक्ष - हॉकी विश्वचषक 2023 चे उद्घाटन

कटकच्या बाराबती स्टेडियमवर रंगणाऱ्या उद्घाटन सोहळ्यानंतर हॉकी विश्वचषक (2023)ची औपचारिक सुरुवात होईल. बॉलीवूड स्टार रणवीर सिंह आणि अभिनेत्री दिशा पाटनी उद्घाटन समारंभात सादरीकरण करणार आहेत.

Hockey World Cup 2023 opening ceremony
हॉकी विश्वचषक 2023 चे उद्घाटन
author img

By

Published : Jan 11, 2023, 6:01 PM IST

Updated : Jan 11, 2023, 7:40 PM IST

कटक (ओडिशा) : ओडिशामध्ये सलग दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. हॉकी विश्वचषक 2023 ची रंगतदार सुरुवात पाहण्यासाठी जगभरातील लोक उत्सुक आहेत. हा हॉकीचा महाकुंभ दर चार वर्षांनी भरवला जातो, ज्याची हॉकीचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

भारतामध्ये चौथ्यांदा हॉकी विश्वचषकाचे आयोजन : भारतामध्ये चौथ्यांदा हॉकी विश्वचषकाचे आयोजन होत आहे. या सोबतच भारत हॉकी विश्वचषकाचे सर्वाधिक वेळा यजमानपद भूषवणारा देश बनला आहे. 17 दिवस चालणाऱ्या या विश्वचषकातील पहिला सामना 13 जानेवारीला तर अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. सर्व सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर खेळवले जातील.

बाराबती स्टेडियमवर होणार सोहळा : कटकच्या बाराबती स्टेडियमवर विश्वचषकाची औपचारिक सुरुवात होईल. बॉलीवूड स्टार रणवीर सिंग आणि अभिनेत्री दिशा पाटनी उद्घाटन समारंभात सादरीकरण करणार आहेत. त्यासोबतच गायिका नीती मोहन आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. याशिवाय ओडिशाच्या नृत्यांगना पद्मश्री अरुणा मोहंती निमिता मलेकासोबत नृत्य सादर करणार आहेत.

हे कलाकार लाइव्ह परफॉर्मन्स देतील : स्निती मिश्रा, प्रिन्स डान्स ग्रुप, रॅपर बिंग डील, ऋतुराज मोहंती, प्रीतम, गायक बेनी दयाल आणि ब्लॅक स्वान डान्स ग्रुप सोहळ्यात परफॉर्मन्स देणार आहेत. तसेच ओडिशाची गायिका श्रेया लेंकाही या सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. सब्यसाची मिश्रा, अर्चिता साहू, लिसा मिश्रा, नकाश अझीझ, एलिना सामंत्रे, अन्नाया नंदा हे कलाकारही यावेळी सादरीकरण करतील.

उद्घाटन समारंभाचे वेळापत्रक :

  • दुपारी 3:00 : कार्यक्रम सुरू
  • 3:50 PM: अरुणा मोहंती यांचे नमिता मेलेकासोबत आदिवासी नृत्य
  • 4:00 pm: स्निती मिश्रा यांचे लाईव्ह परफॉर्मन्स
  • 4:25 PM: प्रिन्स डान्स ग्रुपचे लाईव्ह परफॉर्मन्स
  • 4:35 PM: रॅपर निग डीलचे लाईव्ह परफॉर्मन्स
  • 4:45 PM: ऋतुराज मोहंती लाईव्ह परफॉर्मन्स
  • 5:10 PM: सब्यसाची मिश्रा आणि अर्चिता साहू लाईव्ह परफॉर्मन्स
  • 5:20 PM: लिसा मिश्राचा लाईव्ह परफॉर्मन्स
  • संध्याकाळी 6:00 वाजता : भव्य स्वागत आणि आमंत्रण समारंभ
  • 6:15 PM: लाईव्ह परफॉर्मन्स - हॉकी वर्ल्ड कप गाणे
  • 6:20 pm: मान्यवर पाहुण्यांचे भाषण
  • 6:31 PM: ब्लॅक स्वान डान्स ग्रुपचा लाईव्ह परफॉर्मन्स
  • 6:45 PM: दिशा पाटनीचा लाईव्ह परफॉर्मन्स
  • 6:57 pm: प्रीतम, नीती मोहन, बेनी दयाल आणि इतरांसह युवा मैफल
  • 7:42 PM: रणवीर सिंगचा लाईव्ह परफॉर्मन्स
  • 8:00 PM: नकाश अझीझ यांचा लाईव्ह परफॉर्मन्स
  • 8:25 PM: अलिना सामंतरे यांचा लाइव्ह परफॉर्मन्स
  • 8:35 PM: अनन्या नंदा यांचा लाईव्ह परफॉर्मन्स

Last Updated : Jan 11, 2023, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.