भोपाल: हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप ( Senior Women National Championship ) 2022, 6 मे पासून सुरू होणार आहे. 12 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 27 संघ अव्वल पुरस्कारासाठी स्पर्धा करतील. सहभागी संघांची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. हॉकी मध्य प्रदेश, हॉकी चंदीगड आणि हॉकी बिहार ए गटामध्ये आहेत, तर हॉकी हरियाणा, हॉकी आसाम आणि हॉकी बंगाल बी गटामध्ये आहेत. हॉकी पंजाब, छत्तीसगड हॉकी आणि त्रिपुरा हॉकीचा समावेश सी गटामध्ये आहे. त्याच वेळी, हॉकी महाराष्ट्र, हॉकी राजस्थान आणि हॉकी उत्तराखंडचा समावेश डी गटामध्ये आहे.
हॉकी झारखंड, हॉकी आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी हॉकीचा ई गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर हॉकी कर्नाटक, तामिळनाडूचे हॉकी युनिट आणि हॉकी अरुणाचल, हॉकी अंदमान आणि निकोबार यांना एफ गटामध्ये स्थान देण्यात आले आहे. गट जी मध्ये उत्तर प्रदेश हॉकी, दिल्ली हॉकी, गोवा हॉकी आणि हॉकी गुजरातचा समावेश आहे. तर ओडिशा हॉकी असोसिएशन, केरळ हॉकी, तेलंगणा हॉकी आणि हॉकी हिमाचल यांना गट एच मध्ये ठेवण्यात आले आहे.
विजेतेपद राखण्याच्या शक्यतेवर बोलताना हॉकी मध्य प्रदेशच्या प्रशिक्षक वंदना ( Hockey Madhya Pradesh Coach Vandana ) म्हणाल्या, मला वाटते की आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहोत. प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणे हे आमचे ध्येय आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत.
दरम्यान, गतवर्षीच्या उपविजेत्या संघ हॉकी हरियाणाचे प्रशिक्षक कुलदीप सिवाच ( Hockey Haryana coach Kuldeep Sivach ) म्हणाले की, "गेल्या वर्षी आम्ही विजेतेपदापासून वंचित राहिलो होतो, मात्र यावेळी आम्ही विजेतेपद पटकावू आणि स्पर्धेत हॉकी हरियाणाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी पुढे चालू ठेवू असा मला विश्वास आहे." आम्ही खूप दिवसांपासून सराव करत आहोत आणि जेतेपदासाठी आम्ही नक्कीच आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.
स्पर्धेसाठी त्यांच्या संघाच्या तयारीबद्दल बोलताना हॉकी पंजाबच्या प्रशिक्षक योगिता बाली ( Hockey Punjab coach Yogita Bali ) म्हणाल्या, “स्पर्धेची तयारी खरोखरच चांगली झाली आहे. आमच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा संघ चांगला आहे. गेल्या वर्षी आम्ही तिसरे स्थान पटकावले होते, पण यावेळी आम्हाला अंतिम फेरी गाठण्याची आशा आहे. आठ दिवसीय पूल सामन्यांनंतर 14 मे रोजी उपांत्यपूर्व फेरी, 16 मे रोजी उपांत्य फेरी आणि 17 मे रोजी पदकांचे सामने होतील.