नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट स्टार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हार्दिकला पुन्हा लग्न का करायचे आहे. यावेळी हार्दिकची वधू कोण असणार? याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली असणार. आज, मंगळवार, 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी हार्दिक पांड्या राजस्थानच्या उदयपूरमध्ये दुसरे लग्न करणार आहे. हार्दिकचे आधीच लग्न झाले आहे हे सर्वांना माहिती आहे. हार्दिक आता कोणासोबत लग्न करणार आहे?
![Hardik got married to his fiancee Natasha Stankovic](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17748369_4x3_im5.jpg)
हार्दिकचे सर्बियन डान्सर नताशा स्टॅनकोविकशी लग्न : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी सर्व जोडपी एकमेकांना भेटवस्तू देऊन खास सेलिब्रेशन करतात. यासाठी प्रेमी युगुलांना सरप्राईज आणि भेटवस्तू देऊन आजचा दिवस कसा खास बनवतील याची आधीच योजना आखतात. आता हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत 'व्हॅलेंटाईन डे' कसा साजरा करणार हे पाहावे लागणार आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने 1 जानेवारी 2020 रोजी सर्बियन नृत्यांगना नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले, ज्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे, हार्दिक पुन्हा कोणाबरोबर लग्न करतोय, हे पाहणे आश्चर्याचे असणार आहे.
![Hardik Pandya Remarriage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17748369_4x3_im.jpg)
![Hardik Pandya Remarriage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17748369_4x3_im2.jpg)
हार्दिकने न्यायालयात केले होते लग्न : हार्दिकने 31 मे 2020 रोजी त्याची मंगेतर नताशा स्टॅनकोविकशी न्यायालयात लग्न केले. 30 जुलै 2020 रोजी, हार्दिकची पत्नी नताशा हिने अगस्त्य पांड्या नावाच्या एका सुंदर मुलाला जन्मदेखील दिला आहे. 30 जुलै 2023 रोजी तो तीन वर्षांचा होईल. इतकेच नाही, तर हार्दिक पांड्या काही महिन्यांनी पुन्हा पिता होणार आहे. मंगळवारी 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी हार्दिक पांड्या पत्नी नताशासोबत पुन्हा लग्न करणार आहे. हार्दिक-नताशाचा हा विवाह राजस्थानच्या उदयपूरमध्ये पूर्ण रितीरिवाजांनी पार पडणार आहे.
![Hardik Pandya Remarriage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17748369_4x3_im4.jpg)
हार्दिक आणि नताशा लग्नाचा उत्सव साजरा करणार : हार्दिक आणि नताशा लग्नाचा उत्सव साजरा करणार आहेत. हार्दिक पांड्या आपल्या नताशासोबत पुन्हा लग्न करणार आहे कारण या दोघांनी यापूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. असे मानले जाते की, हार्दिक-नताशाच्या कोर्ट मॅरेजचे कारण असे की, त्यावेळी 31 मे 2020 रोजी कोविडचा लॉकडाऊन होता. पण, आता दोघेही मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत. त्याचवेळी तीन वर्षांचा होणारा अगस्त्य पांड्याही त्याचे वडील हार्दिकच्या लग्नाच्या मिरवणुकीत जाणार आहे. 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा विवाह सोहळा 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये हळद, मेहंदी आणि संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. या भव्य सोहळ्यात हार्दिक-नताशाचे जवळचे नातेवाईक, मित्र आणि बॉलिवूड स्टार्ससह अनेक दिग्गज क्रिकेटपटूही सहभागी होणार आहेत.
![Hardik Pandya Remarriage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17748369_4x3_im3.jpg)