जमशेदपूर - गोल्फपटू गगनजित भुल्लरने टाटा स्टील टूर चॅम्पियनशिप येथे नऊ वर्षांत पहिले पीजीटीआय विजेतेपद जिंकले. चौथ्या आणि अंतिम टप्प्यात ४ अंडर ६८ कार्ड खेळून भुल्लरने हे विजेतेपद पटकावले.
हेही वाचा - व्हिडिओ : रोनाल्डोने जिंकला प्रतिष्ठित 'गोल्डन फूट' पुरस्कार
भुल्लरने पीजीटीआयमधील एकूण दहावे विजेतेपद मिळवले आहे. भुल्लर, चिकरंगप्पा, खलिन जोशी, एसएसपी चौरसिया आणि अमरदीप मलिक यांनी गुणतालिकेत संयुक्तपणे आघाडी घेतल्यामुळे हा सामना रोमांचक झाला होता. चिकरंगप्पा (४-अंडर २६६) २२-अंडर २६६च्या एकूण गुणांसह दुसर्या स्थानावर राहिला. या कामगिरीमुळे तो ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये ११ व्या स्थानावरुन दुसर्या स्थानावर आला आहे.
जोशी (६९) २१-अंडर २६७ च्या गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. राहिल गंगाजीने (२०-अंडर २६८) सर्वोत्कृष्ट कार्ड खेळल्यामुळे त्याने संयुक्तपणे चौथे स्थान मिळवले. त्याच्यासोबत एसएसपी चौरसियाला चौथे स्थान मिळाले.