ETV Bharat / sports

Shikhar Dhawan Video : 'किस्मत मैं ना लिखी हो परी, तो किस बात की 14 फरवरी'; असे म्हणत 'व्हॅलेंटाईन डे'वर शिखर धवनचा मजेदार व्हिडीओ

author img

By

Published : Feb 9, 2023, 1:16 PM IST

शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात कॅप्शन आहे “किस बात की 14 फेब्रुवारी म्हणजे 14 फेब्रुवारीचा मुद्दा काय आहे? या व्हिडीओत एक व्यक्ती शिखर धवनला प्रश्न विचारते 14 फरवरी का प्लॅन काय? यावर शिखर धवनने मजेदार उत्तर देत हसवले आहे.

Funny Video of Shikhar Dhawan on 'Valentine's Day' Saying This Funny Phrase
मजेशीर वाक्य म्हणत 'व्हॅलेंटाईन डे'वर शिखर धवनचा मजेदार व्हिडीओ

हैद्राबाद : भारतीय संघाचा आघाडीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने त्याच्या कारकिर्दीत छान क्रिकेट खेळले आहे. परंतु आता तो सध्या तो एका व्हिडीओने चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शिखर धवनला विचारते, भाऊ तुझा व्हॅलेंटाईन डे प्लॅन काय आहे?" त्यावर या स्टार क्रिकेटर शिखर धवनने मजेशीर उत्तर दिले आहे. शिखर म्हणतो, 'अगर किस्मत में ना लिखी हो परी, तो किस बात की 14 फेब्रुवारी' म्हणजे नशिबात एखादी सुंदर परी नसेल तर, 14 फेब्रुवारीला काय अर्थ आहे, असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.

तडफदार फलंदाज : शिखर धवन सध्या भारतीय संघाबाहेर आहे. अनुभवी डावखुरा सलामीवीर गेल्या काही वर्षांत पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये भारतासाठी मोठी खेळी करणारा तडफदार फलंदाज ठरला आहे. तथापि, सध्या संघ व्यवस्थापन एकदिवसीय सामन्यांमध्ये तरुण पर्यायांचा शोध घेत आहे. याचा अर्थ असा की, धवनला पुनरागमनाची काही आशा असेल, तर त्याच्या हातात काम आहे. तो अजूनही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळत आहे आणि छाप सोडण्यास उत्सुक असेल. दरम्यान, धवनने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कॅप्शन लिहले आहे." किस बात की 14 फेब्रुवारी (14 फेब्रुवारीचा मुद्दा काय आहे)?

वनडे मालिकेत मोठी कामगिरी : बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत धवनने भारतीय संघाची कमान संभाळली होती. जिथे पाहुण्यांना तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. तिसर्‍या सामन्यात त्याने पहिले एकदिवसीय द्विशतक झळकावल्यानंतर इशान मालिकेचे आकर्षण ठरले आहे. धवनसाठी ही मालिका विस्मरणीय ठरली कारण त्याने तीन सामन्यांमध्ये केवळ 18 धावा केल्या. परिणामी त्याला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी संघातून वगळण्यात आले.

धवन दिग्गज खेळाडू : तथापि, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन धवनच्या समर्थनार्थ आला आणि त्याला 'पांढऱ्या चेंडू क्रिकेटचा दिग्गज' म्हटले. 'फक्त जेव्हा टॉप 3 अयशस्वी झाले, तेव्हा आम्हाला भूतकाळात समस्या होत्या. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, आम्ही रोहित आणि कोहलीबद्दल खूप बोलतो, परंतु धवन एक दिग्गज आहे. तो शांतपणे त्याचे काम करीत होता. त्याचे स्थान असेल का? टीम इंडियासाठी एक मोठी पोकळी भरून काढायची आहे का?, अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले.

एकूण 6793 धावा : आम्ही शिखर धवनकडे परत जावे की, नुकतेच द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनला तयार करावे? एका मोठ्या धावसंख्येच्या आधारे खेळाडूला पाठीशी घालण्याऐवजी, संघाला काय हवे आहे ते पाहावे. कोणते पात्र आपल्याला दीर्घकाळ सेवा देईल? तो पुढे म्हणाला. धवनने भारतासाठी एकूण 167 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 17 शतके आणि 39 अर्धशतकांसह एकूण 6793 धावा केल्या आहेत.

हेही वाचा : IND vs AUS : केएल राहुलला धक्का! खुद्द उपकर्णधाराला साईडला करत रवी शास्त्रींची शुभमन गिलला पसंती

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.