नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज सचिन तेंडुलकर सध्या आपल्या आईसोबत चांगला वेळ घालवत आहे. सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने त्याची आई रजनी तेंडुलकरसोबतचा एक व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येतो की, सचिन तेंडुलकरचे त्याच्या कुटुंबाशी किती घट्ट नाते आहे. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले आहे आणि तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही खूप आदर करतो.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आईसोबतचा व्हिडीओ : क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन त्याच्या आईसोबत आंबे खाताना दिसत आहे. आंबा हा फळांचा राजा असल्याचे म्हटले जात असून, आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. सचिन तेंडुलकर त्याच्या आई रजनीला खूप खास मानतो आणि तो आई रजनीच्याही खूप जवळचा आहे. सचिनने शेअर केलेल्या या पोस्टवरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता.
-
Having this season’s first mango 🥭 with a very very very very very very very very very very very very very very very special person in my life! pic.twitter.com/5xDgDeXKg5
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Having this season’s first mango 🥭 with a very very very very very very very very very very very very very very very special person in my life! pic.twitter.com/5xDgDeXKg5
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 26, 2023Having this season’s first mango 🥭 with a very very very very very very very very very very very very very very very special person in my life! pic.twitter.com/5xDgDeXKg5
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 26, 2023
पोस्ट शेअर करीत दिले खास कॅप्शन : ही पोस्ट शेअर करीत सचिनने एक गोंडस कॅप्शनही दिले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'मी माझ्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत सीझनचा पहिला आंबा खात आहे. माझी आई माझ्या आयुष्यात खूप खास आहे'. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये जवळपास 15 वेळा 'खूप' हा शब्द लिहिला आहे. सचिनचे हे अनोखे कॅप्शन आणि त्याच्या आईबद्दल इतके प्रेम आणि आदर चाहत्यांना खूप आवडला आहे.
आईसोबतचे फोटो, व्हिडीओ करतो शेअर : सचिन तेंडुलकर नेहमीच त्याची आई रजनीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतो. त्याच्या एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, 2011 च्या विश्वचषकाचे विजेतेपद जिंकून मी जेव्हा घरी आलो होतो, तेव्हा माझ्या आईने कपाळावर टिका लावून स्वागत केले होते. यानंतरच मला वाटले की, मी काहीतरी मोठे साध्य केले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक लाइक्सही येत आहेत. यासोबतच लोक पोस्टवर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा : Sanjay Shirsat on Sanjay Raut : 'संजय राऊत रोज सकाळी बडबडतात, राज ठाकरे एकदाच पण लाखातला शब्द बोलतात'