नवी दिल्ली - डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) हेवी वेट चॅम्पियन 'द ग्रेट खली' ने ईटीव्ही भारतने घेतलेल्य विशेष मुलाखतीदरम्यान अनेक रहस्यांचा उलघडा केला. डब्ल्यूडब्ल्यूईमधील काही सामने फिक्स म्हणजे निश्चित केलेले असतात, असे खलीने सांगितले.
हेही वाचा - IND vs SL T-२० : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मालिकेत १-० ने आघाडी
डब्ल्यूडब्ल्यूई मधील प्रवास कसा होता आणि भारतातील प्रो रेसलिंगशी निगडित सरकारने कोणती व्यवस्था केली आहे, याची माहितीही खलीने दिली. 'आपण या खेळाला बनावट म्हणू शकत नाही. हे समजून घेण्यात फरक आहे. असे लोक जे चुका करतात ते परिपूर्ण नाहीत. डब्ल्यूडब्ल्यूई आणि कुस्ती हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत', असे खलीने डब्ल्यूडब्ल्यूईबद्दल सांगितले.
'जगातील प्रत्येक गोष्ट कितीही व्यावसायिक असली तरी ती थोडीशी निश्चित आहे. एकाने फिक्सिंग केले तर सर्वांनीच केले असे आपण बोलू शकत नाही. पण, काही ठिकाणी फिक्सिंग होते. माझ्याकडे ऑफर होती पण मी फिक्सिंगपासून दूर होतो. मी कोणतीही तडजोड केली नाही. मी माझ्या आयुष्यात असे कधी केले नाही', असे खलीने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये होणाऱ्या फिक्सिंग प्रकरणी सांगितले. खलीने सरकारी यंत्रणेवरही टीका केली. या खेळाला प्राधान्य देत नसल्याने ही सरकारी कमतरता आहे. सरकारने मुलांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात', असे खलीने मुलाखतीमध्ये म्हटले आहे.